ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी निधन

    153

    ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (ता. २७) संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.रोखठोक वाणीसाठी प्रसिद्धसातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीन नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर हे आपल्या रोखठोक वाणीसाठी प्रसिद्ध होते कीर्तनाच्या माध्यमातन त्यांनी त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.

    आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार केला. फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आठ महिन्यातच बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

    वारकरी सांप्रदायावर शोककळा

    बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केले. जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही त्यांनी स्थापना केली होती. मात्र बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here