- गेल्या काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.
- ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. इगतपुरी येथे काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जाेरदार टीका केली.
- पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाकीची स्थिती निर्माण झाली असून, लोक भाजपवर हसू लागले आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिलं, असे सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.
- दरम्यान नाना पटोले यांच्या या विधानावरून भाजप आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी लागवला. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशारा त्यांनी दिला.
- ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’
- काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले होते.