‘जॅाबलेस’ झालात? तुम्ही कोणता मार्ग निवडणार?

786

सध्या सर्वत्र वेब सीरीजचे वारे वाहत आहेत. नवनवीन वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरत आहेत. अशात जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवीन वेब सीरीज येत आहे. …

 ‘जॉबलेस’ नावाची ही वेब सीरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, अशी या सीरीजची कथा आहे.

सर्व काही सुरळीत सुरु असताना काही कारणास्तव जॉब गेला तर? बिझनेस ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर येत आहे.

‘जॉबलेस’ या वेब सीरीजमध्ये सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘ही वेब सीरीज सात भागांची असून याचे दिग्दर्शन निरंजन पत्की यांनी केलंय. तर, अमित बैचे, पिनाक बडवे, श्रीपाद दीक्षित, क्षीतिज कुलकर्णी यांनी निर्मात्याची तर सिद्धार्थ राजाराम घाडगे यांनी असोसिएट प्रोड्युसरची धुरा सांभाळली आहे. सुनील खरे हे डीओपी असतील. ही वेब सीरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.


\

नशिबाने मांडलेला खेळ जिंकेल का “जॉबलेस”?

पहा ट्रेलर!

Download App Now – https://plt.mt/app

Jobless #TrailerOutNow #StayTuned #31stAugust2021

म #PlanetMarathiOTT #PlanetMarathiOriginals #PlanetMarathi

Planet Marathi OTT | Akshay Bardapurkar | Vistas Media Capital | Abhayanand Singh | Piiyush Singh
Cast: Suvrat Laxman Joshi | Harish Dudhade | Pushkar Sudhakar Shrotri | Mayuri wagh | Swapnalee Patil

Produced by: Gautam Munot | Gautam Munot Productions LLP
Co-Produced by: Emote Icons Harish dudhade amit baiche kshitij s kulkarni pinak badve shripad dixit
Productions
Directed by: Niranjan Patki

Written by: Amit Baiche

Kshitij S. Kulkarni | Pinak Badve | Shripad S Dixit | Sunil Khare | Nikhil Lanjekar | Kedar Divekar | Siddharth Ghadage | vinod raje

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here