#जुन्या पेन्शन साठी जिल्हा परिषद अहमदनगरचे सर्व कर्मचारी संपावर जाणार… समन्वय समितीचा ठराव.

    218

    आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी जुन्या पेन्शनच्या नियोजित संपाबाबत समन्वय समितीची गुगल मीट द्वारे सभा पार पडली.
    दिनांक 14 मार्च 2023पासून बेमुदत संपाबाबत सर्व कर्मचारी संवर्गाच्या पदाधिकारी यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे.
    सन 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांच्या पेन्शन बाबत कर्मचारी संवर्गाच्या तीव्र भावना सभेदरम्यान दिसून आल्या. देशपातळीवर महाराष्ट्र पेक्षा कमी प्रगत राज्ये कर्मवंगाऱ्यांची काळजी घेत जुनी पेन्शन योजना लागू करत आहेत. मात्र महाराष्ट्र मात्र याबाबत कोणताही निर्णय न घेल्याने कर्मचारी संवर्गात तीव्र नाराजी आहे.. जोपर्यंत शासन स्तरावर पेन्शन बाबत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत संप सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून घेतली आहे. शांततामय आणि एकसंघपणे सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संपात सहभागी होणे बाबतचे आवाहन समन्वय समितीने केले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भात सरकार गेल्या 17 वर्षापासून वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित आहे. बक्षी समितीच्या खंड दोन मध्येही जि.प.कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक धोरण अवलंबिले गेले.
    सरकारच्या नव्या पेन्शन धोरणामध्ये कुठलीही स्पष्टता नाही. कर्मचाऱ्यांचे वृद्धापकाळातील जीवन अंधकारमय केल्याची भावना बळवल्यामुळे या सर्वव्यापी संपाचे हत्यार सर्व संघटनांनी उपसल्याची माहिती समन्वय समितीने आज दिली आहे. संपाबाबत पुढील नियोजन करणे बाबत दहा मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद मुख्यालयात समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या गुगल मीट बैठकीत खालील संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
    जुनी पेन्शन हक्क संघटना अहमदनगर
    जि प कर्मचारी युनियन अहमदनगर
    जि प आरोग्य कर्मचारी संघटना अहमदनगर
    जि प ग्रामसेवक संघटना अहमदनगर
    जि प लेखा संघटना अहमदनगर
    जि प लिपिक वर्गीय संघटना अहमदनगर
    जि प चतुर्थश्रेणी संघटना अहमदनगर
    कास्ट्राईब संघटना अहमदनगर
    माध्यमिक शिक्षक संघटना अहमदनगर
    प्राथमिक शिक्षक परिषद अहमदनगर
    प्राथमिक शिक्षक महासंघ अहमदनगर
    प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर
    शिक्षक भरती अहमदनगर
    स्थापत्य अभियांत्रिकी संघटना अहमदनगर
    कनिष्ठ अभियंता संघटना अहमदनगर
    पदवीधर शिक्षक संघटना अहमदनगर
    अपंग कर्मचारी संघटना अहमदनगर
    नर्सेस संघटना अहमदनगर
    औषध निर्माण अधिकारी संघटना
    इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते
    संप यशस्वी होणेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने या योजनेला विरोध करत संपा त सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here