- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2022 पासून सुरु झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करतील.
- 11 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. तत्पूर्वी जाणून घ्या बजेट आणि अर्थसंकल्पाविषयी..
- *बजेट:* बजेट हा फ्रेंच शब्द ‘Bougette’ या शब्दापासून बनला आहे. बजेटचा अर्थ लहान चामड्याची पिशवी असा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचे (बजेट) लोकसभा टिव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. त्याशिवाय डीडी न्यूजवरही लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. तसेच त्यांच्या यूट्यूब चॅनल्सवरही तुम्ही अर्थसंकल्प पाहू शकता.
- *जीडीपी म्हणजे काय ?*
- ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादनं आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.
- जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर 3 महिन्याला प्रदर्शित होते. प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपीचा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवलं जातं. देशाला कोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवलं जातं.
- *वार्षिक जीडीपी (Annual GDP) :* वार्षिक जीडीपीमध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल उत्पादनाशी तुलना केली जाते.
- *तिमाही जीडीपी (Quarterly GDP):* तिमाही जीडीपीमध्ये मागील वर्षाचे कोणत्याही तीन महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.
- *अर्थसंकल्पाविषयी काही खास गोष्टी:*
- ▪️ अर्थ मंत्रालय इतर संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून अर्थसंकल्प तयार करते.
- ▪️ सन 2017 पर्यंत अर्थसंकल्प हा साधारण: फेब्रुवारीच्या 28 तारखेला किंवा एक मार्चला सादर केला जायचा.
- ▪️ सध्या ही परंपरा खंडीत करून आता 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो.
- ▪️ अर्थसंकल्पाचे भाषण सरासरी 90 मिनिटं ते 120 मिनिटांपर्यंत असते. निर्मला सीतारमण यांनी 2021-22 मध्ये सर्वाधिक मोठं भाषण केलं होतं. 160 मिनिटांपर्यंत त्यांचं भाषण सुरु होतं. सर्वात छोटं अर्थसंकल्पीय भाषण हिरूभाई एम. पटेल यांनी केलं आहे. त्यांनी 1977 मध्ये फक्त 800 शब्दांचं भाषण केलं होतं.





