अहमदनगर- नगर तालुक्यात घडलेल्या घटनेत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ४ आरोपींना जन्मठेप तर २ महिला आरोपींना ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याचा तपास डाॅ अनिता जमादार उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण यांनी केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व अति सत्र न्यायाधिश श्रीमती एम व्ही देशपांडे साहेब यांचे समोर झाली.
आरोपीपैकी रंजित राठी, अभय राठी, संदीप राठी, गोपीनाथ गहीले यांना भादवि कलम 307 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 7000 रु दंड, भादवि 324 नुसार 3 वर्ष तुरुगवास, तसेच पोक्सो अँक्ट कलम 7 व 8 नुसार आरोपी गोपीनाथ, रंजित व संदीप यांना 4 वर्ष तुरुंगवास व 4000 रु दंड तसेच महीला आरोपी नामे सौ उषादेवी अभयसिह राठी व निरज परमजित राठी यांना 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व 3000 रु दंड अशी शिक्षा मा जिल्हा व अति सत्र न्यायाधिश साहेब श्रीमती मंजुशा व्ही देशपांडे साहेब यांनी सुनावली.
या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अति सरकारी अभियोक्ता विष्णुदास के भोर्डे यांनी काम पाहिले. पैरवी आधिकारी पोहेकाँ मोहन डहारे यांनी सहाय्य केले आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 40/2014 भादवी कलम 307,143, 147, 148,326,324,323, 504, 506,354 (अ). पो क्सो अँक्ट 7 व 8 वगैरे अन्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी रा बुरुडगाव यांनी त्यांचे शेजारी राहणारे अभयसिंग राठी यांच्याबरोबर पाण्याच्या हौदावरून वाद होता.
दि. 26 फेब्रुवारी 2014 रोजी फिर्यादीची आई ड्युटीवर गेली होती. त्या दिवशी आरोपी अभयसिह राठी याने वाद असलेल्या हौदामध्ये टँकरचे पाणी सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी हिने आई घरी नाही, आई येईपर्यंत तुम्ही वाद घालू नका, त्यावेळी रणजित अभयसिह राठी, संदीप राकेश राठी, गोपीनाथ रामभाऊ गहीले (रा.अरणगाव ता जि अहमदनगर) यांनी फिर्यादीचा विनयभंग केला.
त्यावेळी शेजारी राहणारे राजकिरण विठोबा बर्डे हे तेथे आले व आरोपीस म्हणाले की, फिर्यादीची आई घरी नाही, तुम्ही तिचेशी वाद घालू नका, त्याचा राग आरोपी रणजित राठी, संदीप राठी, हर्ष राठी, व गोपीनाथ गहीले यांना आला व लोखंडी पाईपने फिर्यादी व राजकिरण बर्डे यांचे डोक्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या रविकिरण विठोबा बर्डे व मंदाकिनी विठोबा बर्डे आले असता त्यांना आरोपीचे नातेवाईक उषादेवी अभयसिह राठी व निरज परनजित राठी या दोन महीलांनी लाकडी दांडके व पाईपने गंभीर दुखापत केली. त्यावरून रविकिरणचे वडील विठोबा बर्डे यांनी सर्वाना उपचाराकरीता आनंदऋषी हाँस्पिटल अहमदनगर येथे दाखल केले.
यावरून नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.




