जिल्ह्यात 7 लाख 78 हजार जणांनी घेतला पहिला डोस

820

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 78 हजार 11 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 39 हजार 612 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 19 हजार 303 जणांनी दुसरा डोस घेतला. 46 हजार 233 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 15 हजार 38 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 27 हजार 897 नागरिकांनी पहिला डोस तर 14 हजार 772 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 64 हजार 269 नागरिकांनी पहिला डोस तर 36 हजार 606 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 78 हजार 11 जणांनी पहिला डोस तर 85 हजार 719 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here