जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 522 कोरोनामुक्त, 110 रुग्णांवर उपचार सुरू

568

औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (मनपा 08, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 09 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 246 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 614 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 110 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (04)
नागेश्वरवाडी 1, कांचनवाडी 1, अन्य 2
ग्रामीण (05)
सिल्लोड 1, वैजापूर 4
मृत्यू (02)
घाटी (02)

  1. 65, पुरूष, पवन नगर, औरंगाबाद
  2. 73, पुरूष, भऊर, वैजापूर
    *

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here