जिल्ह्यात एकल वापराच्या प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…

    23

    अहिल्यानगर – एकदाच वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी असतानाही शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साठवणूक, विक्री, वाहतूक आणि वापर सुरू आहे. त्यामुळे व्यापक जनजागृतीबरोबरच साठवणूकदार आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक पार पडली. बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, समितीचे सदस्य तथा हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, प्रा. डॉ. सतीश कुलकर्णी, रविराज पाटील, अमित लाटे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील नगरपालिका व महापालिकांनी दरवर्षी पर्यावरणावरील स्थिती अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वर्षांपासून हा अहवाल तयार न केल्यामुळे पर्यावरणस्थितीचे अचूक आकलन होत नाही. त्यामुळे येथून पुढे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा अहवाल त्वरित तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

    बैठकीत विटभट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नायलॉन मांजा साठवणूक, वाहतूक, विक्री व वापरावर पोलीस विभाग, व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कठोर कारवाई

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here