- राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परिक्षा (इ.८वी) ऑगस्ट २०२१ ला जिल्हा स्थरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घणघणीत यश मिळवून गुणवंत विद्यार्थाच्या मेहनतीने चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नांव लौकीक केल्याने या गुणवंत विद्यार्थाचा शाळेत जाहिर सत्कार करण्यात आला. या शाळेत यापूर्वीही सांस्कृतीक कार्यक्रम, गायन,मैदानातील खेळ, हस्ताक्षर,भाषणे,आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले आहेत, त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेचे नांव तालूक्यात नव्हें तर जिल्हयात गाजलेले आहे. येथील शिक्षक वर्ग हा खरोखरच अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे येथील विद्यार्थी व पालक हे सर्व शिक्षकांचे ऋणी आहे. विध्यार्थ्यांच्या या यशाने पालकवर्ग,ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या कडून गुणवंत विद्यार्थांचे कौतूक केले जात आहे अभिनंदन व्यक्त केले जात आहे. या गुणवंत विद्यार्थाचा शाळेत सत्कार करण्यात आला, गुणवंत विद्यार्थी (१)शबनम युनुस शेख( २)साहिल शकील शेख (३)महेक फारुक मोमीन (४)छाया रघुनाथ कातोरे (५) आर्यन झुंबर बागुल यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले. वेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक रोडे सर, राजाराम काकडे सर,गाडेकर सर,बाचकर सर, सारोक्ते सर,पोपट बारवे,राष्ट्रवादी तालूका उपाध्यक्ष ईसाक सय्यद, उपसरपंच आबासाहेब काळनर,माजी चेअरमन बाबाजान शेख, रघुनाथ कातोरे, झुंबर बागुल,व अंगणवाडी सेविका ,मदतनीस,आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.सूत्र संचालन काकडे सर यांनी केले ,तर मनोगत गाडेकर सर यांनी व्यक्त केले,आभार मुख्याध्यापक रोडे सर यांनी मानले.
Home महाराष्ट्र जिल्हा स्थरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घणघणीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार.