जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर महोत्सवाचे आयोजन:

संविधान जागर महोत्सवाअंतर्गत दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधान जागर रॅली व संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संविधान जागर सभेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती :

अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सहाय्यक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व अहमदनगर सोशल फोरमच्या विविध सामाजिक संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून संविधान जागर महोत्सवाअंतर्गत दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधान जागर रॅली व संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यादृष्टीकोनातून संविधान जागर महोत्सव समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. संविधान जागर महोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी सांगितले कि, मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षी दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्याचा मानवाधिकार अभियान तसेच अहमदनगर सोशल फोरमच्या सर्व पुरोगामी संस्था संघटना यांचा मानस असून यावर्षी संविधान जागर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार अधिक माहिती देतांना नवनिर्वाचित स्वागताध्यक्ष सुधीर लंके म्हणाले कि शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३.०० ते ०६.०० दरम्यान संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रॅलीचा मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा – महात्मा फुले यांचा पुतळा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असा असणार असून संविधान जागर सभेने रॅलीचा समारोप होणार आहे. सदर संविधान जागर सभेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवेढे, अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या संविधान जागर रॅलीस जास्तीत जास्त संस्था, संघटना, महाविद्यालयाचे विध्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा व भारतीय संविधान संवर्धनासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आले. विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ॲड. संतोष गायकवाड – ९०२८५१००२४, सौ. संध्यताई मेढे – ७७०९९८५५५५, सौ.रुपाली सॅम्यूएल वाघमारे – ८७८८४१२७८०, दीपक अमृत – ८९९९२८८६९९, संजय कांबळे – ९९७०७७५५२२ यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here