
नाशिक । विकेट पाडणाऱ्या गौतमी पाटील बाबत एक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणातच गौतमी पाटीलने आप…
तरुणांची विकेट पाडणाऱ्या गौतमी पाटील बाबत एक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणातच गौतमी पाटीलने आपल्या नृत्याचा जलवा दाखवल्या प्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरक यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून संबंधित शाळा वाईन कंपनीला दत्तक दिल्याचाही आरोपही केला आहे.राज्यभरातील गावागावात गौतमी पाटीलची हवा पाहायला मिळते. डान्सर म्हणून ती विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असते. मात्र अनेकदा असे वृत्त समोर आले आहे की गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला. अनेकदा धक्काबुक्की, गर्दी, गोंधळ, खुर्च्याची तोडफोड असे प्रकार तिच्या कार्यक्रमात घडले आहेत. दरम्यान तिच्यावर अनेकदा अश्लील हावभाव करुन लावणीची परंपरा बिघडवल्याचा आरोपही झाला आहे…प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरणार आहे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावरचा डान्स कार्यक्रम.
दीपक केसरक चांगलेच संतापले आहेत.शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, गौतमी पाटील हिला शाळेत कोणी नाचवले, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवले तो घरी जाईल. शाळा वाईन कंपन्यांना कोणी दिली माहिती नाही. आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी आहे. मुळात एकाही शाळेचे खासगीकरण झालेलं नाही. अफवा कोण उठवते? माहिती नाही.पुढे बोलताना म्हणाले, गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा अधिकार तुम्हाल कोणी दिला? असा संतप्त सवालही केसरकर यांनी विरोधकांना केला. गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रातील शाळांमध्ये राहिले पाहिजे का? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.
मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने दत्तक घेतलेल्या प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणीच दोन दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम झाला. त्यामुळे हा कार्यक्रम आता चांगलाच चर्चेत आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री असलेले दीपक केसरक चांगलेच संतापले आहेत.शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, गौतमी पाटील हिला शाळेत कोणी नाचवले, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवले तो घरी जाईल. शाळा वाईन कंपन्यांना कोणी दिली माहिती नाही. आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी आहे. मुळात एकाही शाळेचे खासगीकरण झालेलं नाही. अफवा कोण उठवते? माहिती नाही.पुढे बोलताना म्हणाले, गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा अधिकार तुम्हाल कोणी दिला? असा संतप्त सवालही केसरकर यांनी विरोधकांना केला. गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रातील शाळांमध्ये राहिले पाहिजे का? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.