जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथे जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्परण करण्यात आली.

390
  • . राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथे स्व.जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्परण करण्यात आली. महाराष्ट्राची मदर टेरेसा अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे वय ७३ होते. अनाथांच्या माता म्हणून परिचित असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या जग सोडून जाण्याने संपुर्ण महाराष्ट्रात दु.खाचे डोंगर पसरला आहे. माऊली यांना शोकाकूळ वातावरणात भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करून त्यांना शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथे जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या फोटोला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करुन भावपुर्ण श्रध्दांजली म्हणून शालेय विद्यार्थी यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष संतोष काळनर, दिपक काळनर,सामाजिक कार्यकर्त जमीर सय्यद,राहुरी तालूका पत्रकार शेख युनुस तसेच मुख्याध्यापक रोडे सर,नरवडे मैडम,काकडे सर,गाडेकर सर,बाचकर सर ,बारवे सर,आणि उपस्थित शालेय विद्यार्थी पालक या सर्वानी सिंधूताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. कोरोना लक्षात घेऊन मास्क,सोशल डिस्टैश,आदी गोष्टी लक्षात घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here