- ?राहुरी तालूक्यातील शेरी चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हयातील नायगांव या गावी ३ जानेवारी इ. सन १८३१ रोजी जन्म झाला.आईचे नांव लक्ष्मीबाई, वडील खंडोजी नेवसे पाटील स्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. १ जानेवारी१८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली ,सावित्रीबाई ह्या मुख्याध्यापीकांचे काम काज पाहत होत्या.सुरुवातीला ५/६ मुली होत्या नंतर १८४८ साली मुलींची संख्या ४०/४५ झाली. प्लेग आजाराच्या काळात सावित्रीबाई नी सेवा केली त्या सेवेत सावित्रीबाईंना प्लेग आजार झाला.१० मार्च १८९७ रोजी निधन झाले.सावित्रीबाई फुले जयंती हि ३ जानेवारी ला दरसाल, दरवर्षीप्रमाणे साजरी करून अभिवादन करण्यात येते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण येथे सावित्रीच्या मुलींनाही सावित्रीबाई फुलेंची जन्म गाथा सांगणारी कुमारी प्रगती संतोषभाऊ काळनर हिने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीवर भाषण केले.या वेळी उपस्थित शालेय विद्यार्थी ,मुख्याध्यपक रोडे सर,काकडे सर,गाडेकर सर,नरवडे मैडम ,सारोक्ते सर,बाचकर सर,व शालेय समिती अध्यक्ष, पालक आणि राहुरी तालूका पत्रकार शेख युनुस आदी उपस्थित ,कोरोना प्रादूर्भाव लक्षात घेता ,सोशल डिस्टेनश, मास्क, आदी गोष्टी लक्षात घेऊन सावित्रीबाईंना अभिवादन करुन पुष्पहार अर्पन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.