
अहिल्यानगर – देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिनउत्साहात साजरा होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा फकीरवाडा येथेही हा दिवस देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात ठेवून देशप्रेम जोपासण्याचे आवाहन केले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक मुलाला राष्ट्रनिर्माणात योगदान देता येईल, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सईद सैपान साहेब, सोलापुरे सर, का. शफाकत भाई, तनवीर भाई चश्मवाला, ज्येष्ठ पत्रकार आबिद खान दुलेखन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अयाज खान, मुख्याध्यापक शेख अंजुम अब्दुरुगुफर यांनीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेतील शिक्षकवृंद शेख दिलशाद मुसा, पठाण सुमैय्या मोहसिन, तसेच युवा प्रशिक्षणार्थी बुशरा शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गाणी, कविता आणि भाषणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या वेळी पालक असरूम शाहू, समरीन शेख, मेअराज शाह, अंजुम कुरेशी, जमिर शेख यांच्यासह परिसरातील आजी-माजी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला आणि शिस्तीचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.