जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला जिल्हा दक्षता समितीचा आढावा

499


औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस उपअधीक्षक एस.एस. केंद्रे , सहायक पोलिस निरीक्षक एन. के.चव्हाण आदींची उपस्थिती होती.
जून महिन्यात चार बलात्कार, प्रत्येकी एक विनय भंग, जातीवाचक शिविगाळ, इतर चार असे एकूण दहा गुन्हे घडले. तर जुलैमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ, इतर तीन असे एकूण सात गुन्हे घडल्याची माहिती श्री. वाबळे यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here