जिल्हाधिकारी यांच्या व्दारा कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे बाबतचे (Break The Chain) प्रतिबंधात्मक आदेश जारी.

866

# औरंगाबाद जिल्‍हयात कोविड-19 वर नियं‍ञण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,साथरोग अधिनियम 1897 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदी नुसार औरंगाबाद जिल्‍हयात (मा. पोलीस आयुक्‍त, औरंगाबाद शहर यांचे कार्यक्षेत्र वगळून) लागू केलेले मनाई आदेश यापुढे दिनांक 30 एप्रिल 2021 चे 24.00 वाजेपर्यंत (रात्री 8.00 ते सकाळी 7.00) या कालावधीसाठी रात्रीची संचारबंदी / व दिवसा मनाई आदेश लागू केले आहेत. तसेच यापूर्वी दिनांक 27/03/2021 रोजीच्या आदेशा मध्ये नमूद दंड या आदेशास संलग्न असून तो या दिनांक 30/04/2021 पर्यत लागू राहिल.तसेच जमा होणा-या दंडाची रक्कम संबंधीत आपत्ती व्यवस्थान प्राधिकारणा 1 कडे देण्‍यात येईल. सदर दंडाच्या रक्कमेचा वापर कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी वापरण्‍यात येईल.सदरचे आदेश दिनांक 30 एप्रिल, 2021 चे रात्री 11.59 वाजे पर्यंत लागू राहिल.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही असेही या आदेशात नमूद आहे.

सदरील आदेश अंमलात असतांना पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे अत्‍यावश्‍यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्‍त लॉकडाऊन पर्यवेक्षक/मंडळ अधिकारी/अव्‍वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्‍यापेक्षा वरीष्‍ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी/कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी आणि महसूल अधिकारी/कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत दक्षता घेतील व आवश्‍यक कार्यवाही करतील. उपरोक्‍त अधिकारी/कर्मचारी यांना पोलीस ठाणे प्रमुखांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण लॉकडाऊन आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीस /संघटना /आस्‍थापना विरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यास व अनुषंगिक दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधीकृत करण्‍यात येत आहे.

महानगरपालिका हद्दीत – महानगरपालिका, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.
तसेच महाराष्‍ट्र शासनाचे इतर विभाग जसे अन्‍न व औषध प्रशासन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग,परिवहन विभाग, पुरवठा विभाग इत्‍यादींचे अधिकारी यांचा पथकामध्‍ये समावेश राहिल. या संबंधातजिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे या इतर विभागांचे अधिकारी कार्यवाही करतील.

नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत – नगरपालिका/नगरपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.

गावपातळीवर – ग्रामपंचायत,महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.
वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander)/ सहायक पोलीस आयुक्‍त यांचेकडे सादर करावे. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (Incident Commander) / सहायक पोलीस आयुक्‍त यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.

जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल, 2021 अखेरमनाई आदेशाच्या मुदतीत कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

1. कलम 144 आणि रात्रसंचारबंदी लागू करणे.

अ) औरंगाबाद जिल्हयात (मा. पोलीस आयुक्‍त, औरंगाबाद शहर यांचे कार्यक्षेत्र वगळून)कलम 144 लागू करण्‍यात येत आहे.

ब) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 तेरात्री 8.00 वाजे पर्यत, 5 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध असेल.

क) वरील कालावधी वगळता, उर्वरित कालावधी साठी (म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजे पर्यंत) सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणा शिवाय फिरण्यास किंवा खालील नमूद कारणास्तव दिलेल्या परवानगी शिवाय फिरता / वावरता (संचारबंदी) येणार नाही.

ड) वैद्यकीय तसेच इतर अत्यावश्यक सेवा यामधून वगळण्यात येत आहेत आणि यासाठी होणा-या हालचाली किंवा संचार यास अनुमती आहे.

इ) अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –
i) रुग्णालये, रोगनिदानकेंद्र, चिकीत्‍सालय,वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
ii) किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, दूधडेअरी, बेकरी, मिठाई/ चॉकलेट / केक/ खाद्य/‍मटन, चिकन, अंडी, मासे इ.दुकाने.
iii) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
iv) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्वमान्सून पूर्व उपक्रम व सेवा.
v) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
vi) मालाची / वस्तुंचीवाहतूक.
vii) शेती संबधित सेवा .viii) ई कॉमर्स. ix) मान्यता प्राप्त प्रसिध्‍दी माध्‍यमे ही बाब जिल्हा माहिती कार्यालयाने प्रमाणित करावी. x) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा. xi) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधीत उत्पादने (या आदेशान्वये सुट दिलेल्या बाबी 1.अत्यावश्यक सेवा, 2. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, 3. कार्यालये, 4.खाजगी वाहतूक व्यवस्था, 5. वृत्तपत्रे, 6. लग्नसंमारंभ, 7.औद्योगिक, 8. ऑक्सीजन उत्पादक, 9. ई-कॉमर्स, 10. बांधकाम इ. करिता अनुज्ञेय राहिल.)
xii) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा xiii) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी-माहिती तंत्रज्ञान संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा. xiv) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.
xv) फळ विक्रेते.

2. बाहेरील / सार्वजनिक ठिकाणच्याक्रिया(Activity):–
अ) सर्वउद्याने / सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यत आणि शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजे पर्यत बंद राहतील.

ब) सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेमध्ये येणा-या अभ्यागतांचे कोव्हीड -19 च्‍या अनुषंगाने योग्‍य वर्तन असणे बंधनकारक राहिल.

क) स्थानिक प्रशासनाने वर नमूद सर्व ठिकाणांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे, याची खात्री करावी आणि अशा ठिकाणी गर्दी निर्दशनासआल्यास, किंवा अभ्यागता कडून कोव्हीड 19 नियमांचे पालन केले जात नसल्‍यामुळे कोव्हीड -19 विषाणू संसर्गा चा धोका निर्दशनासआल्यासस्था निकप्रशासनाकडून वरील नमूद सार्वजनिक ठिकाणे तात्काळ बंद केली जातील.

3. दुकाने, बाजारपेठाआणि मॉल्स :–
अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, पूर्ण दिवस बंद राहतील.

अ) अत्यावश्यक सेवा असलेली दुकानेही त्यांच्या परिसरामध्ये ग्राहकां मध्ये योग्य सामाजिक अंतरराखून सुरू राहतील. जास्‍त ग्राहक असतील, अशा ठिकाणी पृष्‍ठभागावर खुणा करून, ग्राहकांना प्रतिक्षाकक्षात, ज्याठिकाणी पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल अशा ठिकाणी बसविले जाईल.

ब) भारत सरकारकडून देण्‍यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार आवश्यक सेवा असलेल्या दुकांनाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे लवकारत लवकर लसीकरण करून घेणेत यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकाना मध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसेकी, पारदर्शक काचे मधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑन लाईन पेंमेंट इत्यादी चे पालन करण्‍यात यावे.

क)याआदेशाने आता बंद करण्‍यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये कामकरणा-या सर्व कामगारांचे भारत सरकार कडून देणेत आलेल्या मार्गदर्शक सूचनां नूसार लवकरात लवकर लसीकरण करून घेण्‍यात यावे. तसेच दुकान मालकांनी दुकानां मध्ये ग्राहकांशी संवाद साधण्‍यासाठी सुरक्षा उपायांचे जसेकी, पारदर्शक काचे मधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑन लाईन पेंमेंट इत्यादी चे पूर्व तयारी करावी, जेणे करून शासना कडून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, सदर दुकाने पुन्हा सुरू करणे बाबत तात्काळ निर्णय घेणे भविष्यात सोईस्कर होईल.

  1. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था –
    सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खालील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहिल.

ऑटोरिक्शा चालक + फक्त 2 प्रवासी
टॅक्सी ( चारचाकी वाहन ) चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 % (RTOविभागा कडील नियमा नुसार )
बस RTOविभागा कडील नियमा नुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी.
कोणत्याही परिस्थितीत उभाराहून प्रवास करणेस (Standing Passenger)प्रवाशांना परवानगी असणार नाही.

अ) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापरकरणा-या सर्व नागरिकांनी काटेकोर पणे योग्य पध्दती ने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. यानियमांचे उल्लघंन करणारे रक्कम रुपये 500/-दंडास पात्र राहतील.

ब)चार चाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये 500/-दंडास पात्र राहतील.
क) प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जंतुकी करण करणे आवश्यक राहिल.
ड) भारत सरकारकडून देण्‍यात आलेल्या निर्देशा नुसार सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे मधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे लवकरात लवकर लसीकरण करण्‍यात यावे. आणि लसीकरण पूर्ण होई पर्यत कोरोनाचे Negative रिपोर्टचे प्रमाणपत्र 15 दिवसांसाठी वैध असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहिल. सदरचा नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.रिक्शा आणि टॅक्सी बाबत जर चालका ने प्लास्टिक शिटच्या किंवा इतर माध्यमातून स्वत:चे विलगीकरण केल्यास त्याला वरील नियमा मधून सूट असेल.

इ) तपासणी मध्ये एखादा चालक किंवा कर्मचारी वर्ग हा NegativeRTPCR प्रमाणपत्र अथवा लसीकरणन घेता काम करत असलेला आढळल्यास, रक्कम रूपये 1000/-दंडास पात्र राहिल.
ई) रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासना कडून प्रवासा दरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून (GeneralCompartment) उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी.
ग) रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क वापरला नसल्या सत्‍यांच्‍याकडून रक्कम रुपये 500/-दंड आकारला जाईल.
घ) ज्या व्यक्ती रात्री 08.00 ते सकाळी 07.00 या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकां पर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

5. कार्यालये –
I) अ) खालील नमूद कार्यालये सुरु राहतील.
i) सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅंका
ii) विद्युत पुरवठा संबंधित कार्यालये .
iii) दूरसंचार (Telecom) सेवा पुरवठा दार
iv) विमा आणि मेडीक्लेम कार्यालये
v) औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालयेजी, उत्पादनाच्या वितरणाशीव व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.
ब) आवश्यकता असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा कडून एखाद्या कार्यालयास सूट देता देईल.
क) सर्व शासकीय कार्यालये 50% क्षमते नूसार सुरू राहतील. परंतु कोव्हीड -19 संसर्ग रोखणे बाबत कामकाज करणे आवश्यक असलेल्या कार्यालयासाठी त्यांच्या विभागप्रमुख यांच्या निर्णया नूसार 100 % उपस्थिती अनिवार्य राहिल.
ड) विद्युत, पाणी, बॅंक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित शासकीय कार्यालये तसेच शासकीय महामंडळेही पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील.
इ) सर्व शासकीय कार्यालये अथवा शासकीय महामंडळे यांच्या मार्फत घेण्‍यात येणा-या कार्यालयातील कर्मचारी व्यतिरिक्त इत रकर्मचा-यांची बैठक ऑनलाईन घेण्‍यात यावी.
ई)कोणत्याही शासकीय कार्यालये अथवा शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना प्रवेश बंद राहिल.अभ्यागतांसाठी ऑनलाईन सेवा तात्काळ सेवा सुरू करण्‍यात याव्यात.
ग)शासकीय कार्यालयाबाबत अपवादात्मक परिस्थितीत त्याशासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख यांच्या परवानगीने 48 तासांचे आतील Negative RT- PCR प्रमाणपत्र असल्‍यास अभ्यागतांसाठी पास देवून प्रवेश देता येईल.
ह)भारत सरकार कडील निर्देशा नुसार खाजगी आणि सरकारी कार्यालयातील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भितीन बाळगता, शासनास कार्यालये सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
II) खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्रशासनाच्या निर्देशा नुसार त्यात काम करणा-याकर्मचा-यांचे लसीकरण करावे लागेल. जो पर्यंत होत नाही तो पर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिल पासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणा-या व्यक्ती कडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येईल.

खाजगी आस्थापना व कार्यालये पुढील प्रमाणे आहेत सुरु राहतील :
अ) सेबी तसेच सेबी मान्यता प्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणा खालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
ब) सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे.
क) सर्व मायक्रो फायनान्स संस्था
ड) सर्व वकिलांची कार्यालये
इ) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्टऑपरेटर ( लस/ औषधी / जीवन रक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
ई) उपरोक्त नमुद कार्यालयाव्यती रिक्त इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

6. खाजगी वाहतूक व्यवस्था –
खाजगी वाहने तसेच खाजगी बससेवा, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 यावेळे मध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या वेळी उर्वरित कालावधी साठी म्हणजेच (सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यत आणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेर्पत) सुरू राहतील.

• खाजगी वाहतूक बुकींग कार्यालये चालू राहतील.
• शनिवार व रविवारच्या विशेष सेवेसाठी RTO कडे अत्यावश्यक बाबींचे विवरण देवून परवानगी घेणे अनिवार्य राहिल.

खाजगी बसेस यांनी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
अ) खाजगी बसेस मधून बसण्‍याच्‍या क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करणेस परवानगी असणार नाही.
ब)भारत सरकारकडून देण्‍यात आलेल्या निर्देशानुसार सर्व खाजगी वाहतूक व्यवस्थे मधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे लवकरात लवकर लसीकरण करण्‍यात यावे आणि लसीकरण पूर्ण होई पर्यंत कोरोनाचे Negative रिपोर्टचे प्रमाणपत्र 15 दिवसांसाठी वैध असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

7. मनोरंजन आणि करमणूक विषयक –

अ) सिनेमा हॉल बंद राहतील.
ब) नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील.
क) मनोरंजन पार्क, आर्केड्स , व्हिडीओ गेम पार्लर्स बंद राहतील.
ड) वॉटर पार्क बंद राहतील.
इ) क्लब, जलतरणतलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले बंद राहतील.
ई) भारत सरकार कडील निर्देशानूसार वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास भविष्यात कार्यालये सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
ग) चित्रपट / मालिका / जाहिराती यांचे चित्रीकरणासखालील अटीं नुसार परवानगी असेल-
i) मोठया संख्येने कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृश्याचे चित्रिकरण करण्‍यास प्रतिबंध असेल.
ii) चित्रिकरणाशी निगडीत सर्वकामगार वर्ग / कलाकार या सर्वाना 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे Negative प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल. सदरचा नियम10 एप्रिल, 2021पासून लागू होईल.
iii)कलाकार आणि संबंधित कामगारवर्ग यांचेसाठी Quarantine Bubble तयार करण्‍यात आल्‍यास, सदर Quarantine Bubble मध्ये प्रवेश करण्‍यापूर्वी कोरोनाचे Negative प्रमाणपत्र सादर केले नंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्ती वर परवानगी देण्‍यात येईल.
(Note:-Quarantine Bubble :-Quarantine bubbles are a way to limit the risk of getting or transmitting Covid19 while expanding social interaction)

8. रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स विषयक –
अ) हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट व बार बंद राहतील. फक्त हॉटेलच्या आतील(Integral Part of Hotel) असे बार रेस्टॉरंटयास अपवाद राहील बार बंद राहतील.

ब) सोमवार ते शुक्रवारया दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळे मध्ये पार्सल सुविधा/ घरपोचसेवा / Take Away सुविधायासुरूराहतील. शनिवार व रविवार यादिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यत सुरू राहील आणि कोणत्याही नागरिकांस या सेवाघेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही.

क) उपहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील परंतु आहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे वास्तव्य करणा-या पाहुण्यांसाठी सुरु ठेवता येईल. बाहेरील व्‍यक्‍तींसाठी तेथे प्रवेश असणार नाही.
ड) भारत सरकार कडील निर्देशा नूसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, लसीकरण झालेले नसल्यास सर्वानी 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे Negative प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल. सदरचा नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
इ) RT- PCR Test प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नाही अशा कामगार वर्गाने घरपोच सेवा दिल्यास त्यांना 10 एप्रिल, 2021 पासून सदर नियमाचा भंग केल्या बद्दल रक्कम रुपये 1000/- दंड आणि संबंधित आस्थापने कडून रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल. नियमांच्या भंगाची द्विरुक्ती (Repeated Offence) केल्यास सदर आस्थापनाचा परवाना रद्द करणे व केंद्र शासन कोविड-19 आपत्ती संपूर्ण पणे संपली असे घाषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.
ई) भारत सरकार कडील निर्देशानुसार रेस्टॉरंट आणि बार आस्थापना मध्ये कामकरणारे व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

9. धार्मिक / प्रार्थनास्थळे –
अ) सर्व धार्मिक / प्रार्थनास्थळे बंद राहतील.
ब) सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळा मध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतु यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणारनाही.
क)भारत सरकार कडील निर्देशा नुसार धार्मिक आणि प्रार्थना स्थळा मध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थना स्थळे सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
ड)एखाद्या धार्मिकस्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने 04 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.

  1. केश कर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटीपार्लर्स –
    अ) सर्व केश कर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
    ब) भारत सरकार कडील निर्देशानूसार सर्व केश कर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटीपार्लर्स मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून / ब्युटी पार्लरस सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
  2. वृत्तपत्रे संबंधित –
    अ) सर्व वृत्त पत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहिल.
    ब) वृत्तपत्रांची घरपोच सेवाही आठवडयातील सर्व दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळे मध्ये करता येईल.
    क) भारत सरकार कडील निर्देशा नूसार सर्व वृत्त पत्रा मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, वृत्तपत्राची घरपोच सेवा देणाऱ्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे Negative प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल. सदरचा नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

12. शाळा आणि महाविद्यालये –
अ) सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
ब) वरील नियमामधून 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्याना सुट असेल. परीक्षा घेणा-या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासा पर्यत वैध असलेले कोरोनाचे Negative RT-PCR Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल.
क) महाराष्ट्र राज्या बाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून औरंगाबाद जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊन देता, स्थानिक आपत्ती प्राधिकरणा कडून परवानगी घेऊन परीक्षा घेता येतील.
ड) सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.
इ) भारत सरकार कडील निर्देशानुसार वरील नमूद आस्थापना मधील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास सर्व शाळा महाविद्यालये आणि कोंचिग क्लासेस भविष्यात सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
ई) परीक्ष देणा-या विद्यार्थ्यास रात्री 08 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.

13. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम –
अ) कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही.
ब) ज्या जिल्हयामध्ये निवडणुका प्रस्तावित असतील, त्याठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचे कडून परवानगी देणेत येईल.
i) भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50% चे अधीन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचारा चे पालन केले जाईल, या अटी वर परवानगी देण्‍यात येईल.
ii) संबंधित परवानगी देण्‍यात आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे अधिकारी यांचे मार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असल्‍याची खात्री केली जाईल.
iii) सदर ठिकाणी कोव्हीड-19 शिष्टाचारा चे उल्लंघन झाल्‍यास संबंधित ठिकाणाचे जागा मालक हे यासाठी जबाबदार राहतील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार दंडास पात्र राहतील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग संपे पर्यत बंद राहिल.
iv) एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्या मध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही.
v) कोणत्या प्रकारचे मिरवणुका, Corner Meetings या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
vi) वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, या विषयी दक्षता घेणे.

  क) लग्न समारंभ यांना जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.

i) लग्न समारभां मध्ये येणा-या पाहुण्यांसाठी सेवा देणा-या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही, तो पर्यंत वैध NegativeRT – PCR Test प्रमाण पत्र सोबत बाळगणे बंधन कारक राहिल.
ii) Negative RT- PCR Test प्रमाणपत्र व लसीकरण केलेले नाही असा सेवा देणारा व्यक्ती निर्दशर्नास आल्यास त्यास रक्कम रूपये 1000/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये 10,000/- दंड आकारला जाईल.
iii) लग्न समारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा- पुन्हा(Repeated Offence)उल्लंघन झाल्‍यास सदर परिसर हा सील केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी कोव्हीड -19 अधिसूचना संपेपर्यंत रद्द केली जाईल.
iv) आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार किंवा रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्या संदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटीं वर परवानगी देईल.
ड) अंत्य यात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्य विधीचे ठिकाणी असणा-या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध Negative RT-PCR Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहिल.

14. रस्त्या वरील खाद्य पदार्थ विक्रेते –
अ) रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्य पदार्थ खाण्यास देण्‍यास बंदी असेल. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 07.00 वा ते रात्री 08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात.
ब) प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरा वर सामाजिक अंतर राखून उभे करावे.
क) सदर आदेशाचा भंग करणा-या खाद्य पदार्थ विक्रेत्या वर साथ रोग संपूर्ण संपे पर्यंत बंद ठेवणेची कार्यवाही करण्‍यात येईल.
ड)ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसी करण होत नाही तो पर्यंत नकारात्मक RT PCR चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10एप्रिल,2021 पासून लागू होईल.
इ)स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते दंड नी यकारवाईस पात्र राहतील.
फ)जर विक्रेते पुन्हा-पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झाल्‍यास व सदर विक्रेते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांचे वर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवणेची कारवाई करण्‍यात यावी.

15. उत्पादनक्षेत्र –
अ) खालील अटीस अधीन राहून उत्पादन क्षेत्र सुरु राहिल.
ब) कारखाने व उत्पादक आस्थापना यांनी त्यांच्या कर्मचा-यांना तापमान तपासूनच प्रवेश द्यावा.
क) सर्व कर्मचारी – व्यवस्थापन व त्याच प्रमाणे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी – यांनी भारत सरकारच्या निकषा नुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.
ड) जर एखादा कर्मचारी/मजूर कोविड चाचणीमध्‍ये सकारात्मक आढळलातर, त्याच्या सोबत निकट संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी / मजूर यांना पगारी रजा देवून त्यांचे अलगी करण करण्‍यात यावे.
इ) ज्या कारखान्यात / आस्थापनेत 500 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील अशा कारखान्यांनी / आस्थापनांनी त्यांचे स्वत:चे अलगीकरण केंद्र स्थापन करावेत.
फ) जर एखादा कर्मचारी कोविड चाचणी मध्‍ये सकारात्मक आढळल्यास, सदर आस्थापनेचे संपूर्ण निर्जंतुकीकरण पूर्ण होत नाही तो पर्यंत सदर आस्थापना बंद ठेवण्‍यात यावी.
ग)जेवण व चहाच्या वेळा वेग वेगळ्या ठेवण्यात याव्यात,जेणे करुन गर्दी होणार नाही, तसेच एकत्र बसून जेवण करण्‍यास मनाई असेल.
ह) सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.
उ)सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तो पर्यंत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
ज) जर एखादा कामगाराची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यास त्याला वैद्यकीय रजा देण्‍यात यावी व त्याला कामावर गैरहजर कारणास्त व कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांसपूर्ण पगारी वेतन देण्‍यात यावे.
झ)औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळख पत्राच्या आधारे रात्री 08.00 तर सकाळी 07.00 यावेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.त्यांनी ओळख पत्ररिबीनच्या सहाय्यानेगळयात बांधावे.

16. ऑक्सिजन उत्पादक –
अ)सर्व औद्योगिक आस्थापनांना दिनांक 10 एप्रिल, 2021 नंतर ऑक्सिजन वापर कच्चा माल म्हणून करता येणार नाही. तथापी योग्य कारणास्तव त्यांचे परवानाप्राधिका-या कडून पूर्वपरवानगी घेवून वापर करता येईल. सर्व परवानाप्राधिका-यांनी अशा आस्थापनां कडील दिनांक 10 एप्रिल, 2021 नंतर ऑक्सिजन चा वापर थांबवावा किंवा त्याची पूर्व परवानगी घ्यावी.
ब) सर्व परवाना मंजुरी प्राधिकरणांनी ऑक्सिजन उत्पादनकरणा-या आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनापैकी 80% ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषध निर्माणासाठीच राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यांनी त्यांच्‍या ग्राहकांची नावे दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून प्रसिध्द करावीत.याची दक्षता घ्यावी.

17. ई-कॉमर्स –
अ)ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारतसरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तो पर्यंत Negative RT PCRचाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. सदरनियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
ब)सदर आदेशाचा भंग करणा-या आस्थापनांचा परवाना कोविड-19 प्रादुर्भाव संपुष्टात येई पर्यंत निलंबीत करण्‍यात येईल.

  1. सहकारी गृह निर्माणसंस्था –
    अ)कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एकावेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृहनिर्माण संस्था सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल्.
    ब) अशा गृह निर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेशबंदी असल्‍याबाबतचा फलक लावणे बंधनकारक असेल.
    क) सोसायटी मध्ये तयार करण्‍यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कोणत्याही नागरिकांचा प्रवेश व बाहेर जाणे या बाबत सोसायटी मार्फत प्रतिबंध असावा.
    ड) जर एखाद्या गृहनिर्माण संस्थेने उक्त नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये 10,000/- दंड करण्‍यात येईल व दुस-या वेळेस त्या पेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरविलेप्रमाणे आकारण्‍यात येईल. सदर आकारण्‍यात आलेल्या दंडाच्या रक्कमेचा वापर हा सोसायटी मध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करण्‍यात येईल.
    इ)सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणा-या व्यक्तींची ते जो पर्यंत लस घेत नाहीत तो पर्यंत RT PCRचाचणी शासकीय निर्देशानुसार करावी.

19. बांधकामव्यवसाय –
अ)ज्या बांधकाम क्षेत्रात बांध कामाशी संबंधीत कर्मचारी / मजूर यांना त्याच ठिकाणी राहण्‍याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल. अशा ठिकाणी साधन सामुग्री वाहतुकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही.
ब)ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेलत्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तो पर्यंत नकारात्मक RT PCRचाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
क) नियमांचे भंग करणा-या बांधकाम व्यावसायिकांस रक्कम रुपये 10,000/- दंडआकारण्‍यात येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झाल्‍यास सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग कमी होत नाही, तो पर्यत बंद करण्‍यात येईल.
ड) एखाद्या कामगार हा कोव्हीड -19 विषाणू Positive आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्‍यात यावी. त्याला कामावर गैरहजर कारणास्त व कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांसपूर्ण पगारी वेतन देण्‍यात यावे.

  1. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकीयांच्या रात्री ८नंतर येजा करण्याच्या बाबतीत अनुमती देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here