अलिबाग,जि.रायगड, (जिमाका)- जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले.
या सर्व परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हाधिकारी, पालघर तसेच हिंदुस्थान कोका कोला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पूरबाधितांसाठी 7 हजार 200 पाण्याच्या बाटल्या, 4 हजार 300 बिस्कीट पुडे, छेडा कंपनी चे 4 हजार 800 भेळ मिक्स पॉकेट
तसेच तहसिलदार तलासरी यांच्याकडून 70 सतरंजी, 60 बेडशीट, 50 सोलापुरी चादर वाडा येथून माणगावसाठी रवाना कऱण्यात आले.
तसेच Paracetamol 500 mg – 500 पॅकेट्स, . Dolo 500 mg – 250 पॅकेट, Doxycycline 100 mg – 500-1000 पॅकेट, Electrol powder – 2000 पॅकेट्स, कैलास जीवन – 200 पॅकेट ही औषधेही देण्यात आली आहेत.
००००००