? जाॅब अपडेटस : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज..!
पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली. विविध पदांसाठी ही भरती होत असून, त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
? पद, शैक्षणिक पात्रता व अनुभव
▪️ समुपदेशन – एमएसडब्लू आणि काउन्सिलिंग डिप्लोमा, तसेच एक वर्षाचा अनुभव.
▪️समूहसंघटिका – एमए (मानसशास्त्र किंवा समाजशास्र), एक वर्षाचा अनुभव.
▪️कार्यालय सहाय्यक – बारावी उत्तीर्ण, टायपिंग- मराठी आणि इंग्रजी. दोन वर्षांचा अनुभव.
▪️ व्यवसाय गटप्रमुख मार्गदर्शक – बी. कॉम किंवा पदवीधर, समाज विभागात पाच वर्षांचा अनुभव.
▪️ संसाधन व्यक्ती – एम.कॉम. आणि पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील दोन वर्षांचा अनुभव.
▪️ विरंगुळा केंद्र समन्वयक – बारावी उत्तीर्ण. पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागात एक वर्षांचा अनुभव.
▪️ सेवा केंद्र समन्वयक – दहावी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा किमान अनुभव.
▪️ सेवा केंद्र मुख्य समन्वयक – सातवी उत्तीर्ण, व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण असावा.
▪️ स्वच्छता स्वयंसेवक – चौथी पास आणि एक वर्षाचा अनुभव.
▪️ संगणक संसाधन व्यक्ती – बारावी उत्तीर्ण, कंप्यूटर कोर्स आवश्यक.
अर्जासाठी पत्ता
एस. एस. जोशी हॉल,
५८२ रास्ता पेठ,
टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी
पुणे -११
?? (या भरतीसाठी अर्जदारांनी स्वतः सर्व कागदपत्रांसह पत्त्यावर उपस्थित राहणं आवश्यक)
? आवश्यक कागदपत्रे
▪️ जन्मतारखेचा दाखला
▪️ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
▪️ विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र
▪️ ओळखपत्र
▪️ टायपिंग उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र
▪️ शैक्षणिक प्रमाणपत्र




