नांदेड- मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाचे काम आता हाती घेण्यात आले आहे.
▪️समृद्धी महामार्गाद्वारे जालना-नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. याद्वारे शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटर एवढे कमी होईल. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा 12 तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे.
▪️ परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे.
▪️जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी 179 किलोमीटर असून 87 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या 87 गावांपैकी 67 गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली.
जालना-नांदेड द्रुतगती मार्गाची वैशिष्ट्ये काय?
▪️ संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी एकूण 2200 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.
▪️ बांधकामासाठी 14 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे.
▪️ या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन पुढील चार महिन्यात पूर्ण केले जाईल.
▪️ ऑक्टोबर 2024 पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे.
▪️ जालना-नांदेड द्रुतगती मार्गामुळे जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे उर्वरीत महाराष्ट्राशी जोडले जातील.