
माजी नगरसेवक शेख मुदस्सरअहमद इसहाक यांनी केले खेळाडूंचे कौतुक विशेष करून लहान मुलींनी सहभाग घेतला व त्यांच्या पालकांनी इतक्या लांब स्पर्धेकरिता मुलांना जाण्याची परवानगी दिली व स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी दिली अशा पालकांची सुद्धा कौतुक करून प्रथमता त्या पालकांची सत्कार केले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक शेख मुदस्सरअहमद इसहाक यांनी व्यक्त केली
महेक पठाण , अरफा शेख , इब्राहिम शेख यांची सुवर्ण कामगिरी !
याहया सय्यद यास रजत पदक , तर आलिया सय्यद , अशाज शेख , अहमद शेख , अरकम सय्यद , यांना कांस्य पदक
अहमदनगर प्रतिनिधी : जयपूर , राजस्थान येथे दि. ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर ला झालेल्या खेल कराटे लीग च्या सीझन 2 मध्ये महाराष्ट्र संघाने कामगिरी केली असून
विशेष म्हणजे महाराष्ट्र संघात या वर्षी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील युथ कराटे फेडरेशन या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या ८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.
या मध्ये १४ वर्ष खालील महिला गटामध्ये महेक पठाण , आरफा शेख , आलिया सय्यद , तर १४ वर्ष खालील पुरुष गटामध्ये आशाज शेख , अहमद शेख , इब्राहिम शेख , अरकम सय्यद , आणि १७ वर्षा खालील वयोगटात यहया सय्यद हे नगर शहरातील खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होते.
खेल कराटे लीग या स्पर्धेत भारतातील २९ राज्यातील सुमारे ३००० खेळाडू मोठ्या उत्सहात सहभाग नोंदवला आणि आप आपल्या राज्य संघाचे नेतृत्व करून बाजी मारली. खेल कराटे लीग मधील विजेत्या खेळाडूंवर बक्षिसे आणि कौतुकांचा मोठा वर्षाव देखील पहावयास. मिळाला विजेत्या खेळाडूंना , प्रमाण पत्र , पदक , आणि बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देखील प्रदान करण्यात आली.
तसेच खेल कराटे लीग या स्पर्धेचे विविध प्रसार माध्यमांवर थेट प्रक्षेपण देखील केले. जाते या वर्षी हि विविध प्रसार माध्यमांवर तसेच विविध ओटीटी माध्यमांमध्ये या लीग चे प्रक्षेपण ८ ते ११ सप्टेंबर ला करण्यात आले होते.
यामध्ये नगर शहरातील महेक पठाण , अरफा शेख , इब्राहिम शेख यांनी सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले , तर याहया सय्यद यास रजत पदक , आणि आलिया सय्यद , अशाज शेख , अहमद शेख , अरकम सय्यद यांना कांस्य पदकांची कमाई केल.
नगर शहरातील सर्वच विजेत्या खेळाडूंना युथ कराटे फेडरेशनच्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रशिक्षक साहिल सय्यद आणि सबील सय्यद नेहमीच प्रयत्न करत असतात.
तर खेल कराटे लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल नगर शहरातील या विद्यार्थी खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
खेल कराटे लीगचे सामने ८ सप्टेंबर ते 11 सप्टेंबर एस.एम.एस स्टेडियम जयपूर, राजस्थान येथे रंगले होते.
