जागतिक कन्या दिवस: मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख
? केंद्र सरकारच्या या योजनेत जन्मापासून 10 वर्षाच्या मुलींचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाते. मुलींच्या शिक्षणासाठी बचत करणे हा योजनेचा हेतू आहे. या योजनेत तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
??♂️ जाणून घ्या कसा होईल फायदा-
▪️ या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षासाठी कमीत कमी रक्कम 250 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील.
▪️ या खात्यामध्ये 1.5 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर ती व्याजासाठी मोजली जाणार नाही. एका खात्यात 15 वर्षांपर्यंत डिपॉझिट केले जाऊ शकते.
▪️ सुकन्या समृद्धी योजनेमध्ये यावेळी 7.6 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये खाते उघडताना जे व्याज असते, त्याच दराने संपूर्ण गुंतवणुकीच्या काळात व्याज मिळते.
▪️21 वर्षांनी ही योजना मॅच्यूअर होईल. 21 वर्षांंनी ही रक्कम व्याजासह वाढून 64 लाख रुपये होईल. या योजनेत मिळणारे व्याज सरकार प्रत्येक तिमाहीमध्ये निश्चित करते.
? खाते कसं उघडाल?
? तुम्ही मुलीचे कायदेशीर पालक असल्यासच तुम्ही हे खाते उघडू शकता. अर्जदाराला फॉर्मबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आणि आईवडिलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) तसंच ॲड्रेस प्रुफ (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी) द्यावे लागेल।





