जल जीवन मिशन : गणोरे च्या ग्रामत जल जीवन मिशन अधिकारी

    150

    अकोले: (Akole) तालुक्यातील गणोरे गावची लोकसंख्या विचारात न घेता जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) ने आपल्या सर्व्हेक्षणात गावासाठी पाणी साठवणुकीसाठीची नवीन टाकीची तरतूद केलेली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत (Gram Sabha) अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर पाणी साठवण्यासाठी दोन उंच टाक्यांच्या मंजुरीची मागणी करत ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधली.

    मारुती मंदिरात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष आंबरे होते. दरम्यान, मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांनी केले. विषय पत्रिकेनुसार मतदार यादीत नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती व मयत, परागंदा व्यक्तींची नावे वगळणे, गावस्तरीय शासकीय-निमशासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. बीपीएलमधील परागंदांची नावे वगळून नवीन समावेश, नवीन आशा सेविकांची निवड करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली.

    जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) चे अधिकारी आल्यानंतर यावर चर्चा सुरू असताना गणोरे गावच्या लोकसंख्येला विचारात धरून नवीन आराखड्यात गावासाठी जुन्या दोन निर्लेखित टाक्या ग्राह्य धरल्याने नवीन टाकीची तरतूद केलेली नाही. कोणती लोकसंख्या विचारात घेऊन तरतूद केली, गावची लोकसंख्या किती धरली, जलजीवन मिशन (Jaljeevan Mission)चे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे.

    यासंदर्भात ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकार्‍यांना उत्तरेही देता आले नाही. यामुळे सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला. यावेळी अनेक महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले. भाऊसाहेब दातीर, माजी सरपंच अशोक आंबरे, रामनाथ दातीर, डॉ. सचिन दातीर, शुभम आंबरे, के. बी. आंबरे, अनिल आंबरे, सुशांत आरोटे, गणपत दातीर, दत्ता आहेर आदिंनी सहभाग घेतला. शेवटी सर्व विषय संपल्यानंतर सरपंच संतोष आंबरे यांनी आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here