जम्मू काश्‍मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना

648
  • सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैन्यदलाने केले आहे. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही मूर्ती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापन करण्यात आली आहे.
  • जगात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढ्या उंचीवर बसवण्यात आली आहे.
  • मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या बसवण्यात आल्या आहेत. एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या ‘मराठा स्मृतिस्थळ’ येथे बसविण्यात आली आहे. पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी याची निर्मिती केली आहे. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
  • मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी सांगितले की, प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऊन, पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही. दरम्यान हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फॅन्ट्रीच्या ५६ राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या हेतूने येथे महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आल्याचे कर्नल पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here