जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस निरीक्षकावर दहशतवाद्यांचा हल्ला, सुरक्षा दलाचे चोख प्रत्युत्तर 

353

 Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात नमाज अदा करून मशिदीतून परतणाऱ्या पोलीस निरीक्षकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. बटामालू भागात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून प्रत्युत्तराची कारवाई करण्यात येत आहे.   दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी  जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनमधून सोडलेल्या शस्त्रांचा साठा जप्त केला होता. “पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सांगण्यावरून लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फोर्स या दहशतवादी संघटनांनी ड्रोनमधून ही शस्त्रे सोडली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने   जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा-अर्निया भागात शोध मोहीम राबवली होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

 ‘या ऑपरेशन दरम्यान अर्निया सेक्टरमधील ट्रेवा गावातून दोन मॅगझिन, 70 काडतुसे, एक पिस्तूल, तीन डिटोनेटर्स, तीन रिमोटली कंट्रोल्ड आयईडी, तीन स्फोटकांच्या बाटल्या, कॉर्टेक्स वायरचे एक बंडल, दोन टायमर आयईडी आणि सहा ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here