➖➖➖➖➖➖➖➖
जमिनीवर बसून जेवल्याने आरोग्याला होतात हे फायदे, जाणून घेण्यासाठी वाचा..!_
➖➖➖➖➖➖➖➖
? भारतात प्राचीन काळापासून जमिनीवर बसून जेवण करण्याची पद्धत आहे.. काळाच्या ओघात ही पद्धत मागे पडली..नि डायनिंग टेबल किंवा उभे राहूनच जेवणाची पद्धत सुरु झाली..
?? आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास आपण काय खातो, तसेच ते कसे खातो यालाही महत्व आहे.. जमिनीवर बसून जेवणाचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…
??♂️ तणाव कमी होतो..
जमिनीवर मांडी घालून बसतो, ती ‘सुखासन’ किंवा ‘पद्मासन’ मुद्रा आहे.. त्यामुळे एकाग्रता वाढते, मानसिक ताण दूर होतो. टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने आरोग्याला हा फायदा होत नाही.
??♂️ पचनक्रिया सुधारते
जमिनीवर बसून जेवताना घास घेण्यासाठी ताटाकडे झुकावे लागते. पुढे-मागे वाकण्याची क्रिया होत असल्याने पोटाचे स्नायू सतत काम करीत राहतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
? रक्ताभिसरण सुधारते
खाली बसून खाण्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हृदयाला कमी काम करावं लागते.
??? सांधेदुखीपासून आराम
मांडी घालून बसताना गुडघ्यांचाही व्यायाम होतो. त्यामुळे सांध्यांचे स्नेहन कायम राहते. त्यातून सांधेदुखीपासूनही आराम मिळतो..
?? वजन नियंत्रित राहते
जमिनीवर बसून जेवताना पचनक्रिया नैसर्गिक स्थितीत असते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
?? (टीप : लेखातील माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)