बारामती :- जबरी मारहाण केल्याच्या खटल्यातून सागर खलाटे व त्यांचे दोन साथीदार सागर दळवी, सुरेंद्र(बाळू) चव्हाण या आरोपींची बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एन. वाघडोळे यांनी निर्दोष मुक्तता केली.ही घटना बारामती येथील हॉटेल निर्मल भवन समोर ८ जुलै २००७ रोजी सायंकाळी ५.४५च्या सुमारास घडली होती.आरोपी व त्यांचा मित्र श्री.बनकर यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून भांडण झाले. त्यात आरोपींनी तलवार,वस्तरा आणि काठय़ांनी मारहाण केली आरोप होता. फिर्यादी व साक्षीदार श्री.आगावणे यांच्या नाक,गाल तसेच हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या.या बाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले होते.विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर झाला नाही.भर दिवसा बारामतीमधील गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती.तसेच यातील फिर्यादी व आरोपी यांचा राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.सदरची मूळ घटना वेगळीच आहे.त्यात एकाच आरोपीचा हजर असल्याचा उल्लेख होता.तसेच उभयतांमध्ये केवळ शाब्दिक चकमक झाली होती. इतर आरोपींना या प्रकरणात मुद्दाम गोवले आहे.त्या बाबत आरोपी यांनी एक तक्रार पोलिस ठाण्यात दिली असल्याचे आरोपींच्यावतीने ॲड.विशाल बर्गे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच त्याची प्रत ॲड. बर्गे यांनी पुरावा म्हणून कोर्टात सादर केली.त्यानंतर या खटल्याला वेगळेच वळण लागले होते.फिर्यादी,साक्षीदार सगळे पंच हे एकमेकांचे खास मित्र होते, हे त्यांच्या उलट तपासात सिद्ध झाले.फिर्यादी व जखमी यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये घटनास्थळ,हत्यारे तसेच तिथे हजर असलेले तथाकथित साक्षीदार यांच्याबाबत मोठी तफावत असल्याचे वकील ॲड.बर्गे यांनी यांनी कोर्टाच्या निर्दशनास आणून दिले तसेच तोंडी पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यात कसा विरोधा भास आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.शिवाय अतिशयोक्ती पूर्ण फिर्याद दिल्यामुळे तथाकथित हल्ल्याची घटना घडली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.त्यामुळे सरकारी पक्षाने दिलेला कोणताच पुरावा विश्वसनीय नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.याकामी इतर आरोपीतर्फे ॲड.तौफिक शिकिलकर यांनीही काम पाहिले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
फेकलेले नारळ, पान गुटख्याचे डाग: नव्याने उदघाटन झालेल्या अटल सेतूमध्ये बदमाशांनी टाकला कचरा, नेटकऱ्यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी काही अज्ञात चोरट्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (अटल...
‘झिका व्हायरस’ बचावासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन
'झिका व्हायरस' बचावासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहनजिल्ह्यात सद्य:स्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण नसल्याची आरोग्य विभागाची माहितीअहमदनगर: राज्यात पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस आढळून...
संसदेचे कामकाज | राज्यसभेने दोन करप्रणाली विधेयके परत केल्यामुळे निर्मला म्हणाल्या, जीएसटी राजवटीने किमती...
केंद्रीय वस्तू व सेवा कर (दुसरी दुरुस्ती) विधेयक आणि तात्पुरती कर संकलन विधेयक या दोन विधेयकांवर राज्यसभेने 20...
गुजरातच्या माणसाने दुबईतून ५० लाख रुपयांचे सोने तस्करी करून चोरले
अहमदाबाद: दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी म्हणून कथितपणे दोन पुरुषांनी एका व्यक्तीचे अपहरण करून ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या...




