जन आशीर्वाद यात्रे मधील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
??♂️औरंगाबाद शहरात जन आशीर्वाद यात्रा च्या नावाने हजारो लोकांचा जमाव जमवण्यात आला होता. या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी विनापरवानगी स्टेज उभारले होते. त्रिमूर्ती चौक येथे जालिंदर शेंडगे आणि विष्णू नगरातील दुर्गामाता मंदिराजवळ अक्षय म्हात्रे, तसेच काल्डा कॉर्नर येथे चंद्रकांत सुखदेव हिवराळे सहकार चौकात सागर निळकंठ व सूतगिरणी चौकात योगेश रतन वाणी या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या स्टेज उभारला होता. आणि त्या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला होता.
▪️या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होती आणि कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली.
▪️या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पाठोपाठ पदमपुरा रोहिदास चौकात विनापरवाना स्टेज बांधून यात्रेचे स्वागत केल्याने वेदांत नगर पोलिस ठाण्यात सुनील सोनवणे, उत्तम बरतूने, संतोष बरंडवाल, सुरेश महेर सह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील ज्या भागातून यात्रा गेली त्या संबंधित पोलिस ठाण्यात संयोजकांचे दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Facebook page




