* शस्त्रक्रियेसाठी 194 कोटींचा खर्च * जिल्हाधिका-यांकडून योजनेचा आढावावर्धा, दि.8 (जिमाका) : सामान्य रुग्णांना विनामुल्य उपचार व शस्त्रक्रीयेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोगय योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हयातील आठ रुग्णांलयांमध्ये 78 हजार रुग्णांवर विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. याकरीता या योजनेतून शस्त्रक्रीयेवर 194 कोटींचा खर्च झाला आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गरजू रुग्णांना समाविष्ठ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या. जन आरोग्य योजना, तंबाखू नियंत्रण, मुखरोग, क्षयरोग, एड्स नियंत्रण आदीचा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे आदी उपस्थित होते.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 996 उपचार व 121 पाठपुरावा सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक कुंटूंबाला दरवर्षी 1 लाख 50 हजार रुपयांची शस्त्रक्रीया सेवा या योजने अंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणसाठी 2 लाख 50 हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रति कुंटूंब 5 लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्हयात आठ रुग्णालयामध्ये ही योजना राबविण्यात येते. त्यात कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी, डॉ. राणे आर्थोपेडीक हॉस्पीटल आर्वी, डॉ. लोढा आर्थोपेडीक हॉस्पीटल हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजाचा समावेश आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात 31 हजार 794, सावंगी येथील रुग्णालयात 42 हजार 637, जिल्हा रुग्णालय वर्धा येथे 2 हजार 137, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, आर्वी व ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे 413, डॉ. राणे हॉस्पीटल 1 हजार 258 व लोढा हॉस्पीटल येथे 462 अशा एकुण 78 हजार 701 रुग्णांवर जन आरोग्य योजने अंतर्गत विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत रुग्णांच्या शस्त्रक्रीयेसाठी विमा योजनेतून 194 कोटी इतका खर्च झाला आहे. सामान्य रुग्णांना शस्त्रक्रीयेचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांचा या योजनेत समावेश करुन जास्तीत जास्त रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला पाहीजे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी बैठकीत सांगितले. एड्स नियंत्रण, तंबाखू नियंत्रण व मौखिक रोग नियंत्रण कार्यक्रमाचाही त्यांनी बैठकीत आढावा घेतला.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
राष्ट्रीय गणित दिवस 2022: श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन आणि कार्याबद्दल 10 तथ्ये
दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ही तारीख प्रख्यात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची...
हल्दवानी हिंसाचार: मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक दिल्लीतून पकडला; समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या भावालाही अटक करण्यात...
उत्तराखंडच्या हल्दवानी येथील हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची...
ओला, उबेर आणि रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांवर दिल्लीत बंदी: संपूर्ण कथा 5 गुणांमध्ये
दिल्ली सरकारने बाईक टॅक्सीवर तात्काळ बंदी घातली आहे. शहरातील लोकप्रिय असलेल्या ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कॅब...
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी