जनावर चोरीच्या गुन्ह्यात तिन जन अटक….2,10,000/- रु. किं मुद्देमाल श्रीगोंदा पोलीसांनी केला जप्त..
दि.25/08/2021 रोजी फिर्यादी श्री तानाजी गुलाबगिरी गोसावी रा. रुईखेल ता. श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की, दि. 23/8/21 रोजी रात्री फिर्यादीचे शेत गट नं. 327 मधील शेतातील गोठ्यातुन 20,000/- रु. किंमतीची 4 ते 5 वर्षे वयाची जर्सी गाय काळ्या तांबड्या रंगाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वैगेरे मजकुरचे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 577/2021 भा.द.वि 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.दि. 25/08/2021 रोजी सपोनि. श्री दिलीप तेजनकर सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा हा आरोपी शायबाज अन्सार शेख रा. चिंचोली रमजान ता. कर्जत याने त्याचे साथीदारासह केला आहे. बातमी मिळालेवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी नामे 1) शायबाज अन्सार शेख रा. चिंचोली रमजान ता. कर्जत यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केला असल्या कबुल केले असुन 2) रियाज हमीद शेख रा. रमजान चिंचोली ता. कर्जत याचा गुन्ह्यात वापरलेला एक छोटा हत्ती मालवाहु गाडी नं. एम. एच. 14 सी. पी. 8522 ही जप्त केली आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली गाय ही 3 ) शोयब सलीम कुरेशी रा. सिध्दार्थनगर ता. कर्जत यास विकली असुन ती पुढे त्याने आळेफाटा येथिल बाजारात 10,000/- रुपये किंमतीला विकल्याची सांगत आहे. सदर आरोपींकडुन 10,000/- रुपये हस्तगत केले आहे. सदर गुन्ह्यातील ईतर फरार आरोपी अटक झाल्यानंतर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास स.फौ भानुदास नवले हे करीत आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब, पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप तेजनकर, सफौ. अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोका प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोका दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोका प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.






