
हिंदू धर्मात सर्वात प्रथम गणपती बाप्पाचीच पूजा केली जाते. मात्र या गणेशोत्सवात एक आगळी वेगळी बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काहीकाळापूर्वी इंडोनेशिया या देशात नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापला जात होता. विशेष म्हणजे या देशात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. पण असे असतानाही येथे नोटेवर गणपतीचे चित्र आहे. इंडोनेशियन सरकारने 1998 मध्ये ही नोट जारी केली होती. भारतातील चलनाप्रमाणे येथील चलनही प्रचलित आहे. महत्वाचं म्हणजे इंडोनेशियामध्ये 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे. तसेच यामागच्या बाजुला इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवंत्रा यांचे चित्र आहे. देवंत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत. इंडोनेशियामध्ये श्रीगणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानले जाते. त्यामुळे इंडोनेशिया या देशाच्या नोटेवर गणपती आणि शिक्षकाचा फोटो आहे. मात्र आता ही नोट इंडोनेशियामध्ये चलनात नाही.