जगधने कुटुंबीयांचे शेवगाव तहसील समोर बेमुदतआक्रोश आंदोलन.. दिवस पहिला.

शेवगाव-एरंडगाव तालुका शेवगाव हद्दीतील रहिवासी कै.शाहूराव विठ्ठल जगधने यांना अंकुश उत्तम गजभीव यांनी फूस लावून वाली वारसाच्या संमती शिवाय गट नंबर 240/1मधील क्षेत्राबाबत खोटे मृत्युपत्र तयार करून कामगार तलाठी कुणाल गोंधळी , मंडलाधिकारी विठ्ठल भडके यांच्याशी संगनमत करून तहसीलदार छगन वाघ यांच्या आदेशाने फेर नं. 11660 नुसार जमीन हस्तगत केली. आणि जगधने यांच्या वालीवारसांना भूमिहीन केले. याबाबत कै. शामराव विठ्ठल जगधने यांच्या पत्नी हिराबाई जगधने आणि त्यांच्या मुलांना सदर प्रकार समजल्यावर प्रांताधिकारी पाथर्डी यांच्याकडे फेर नंबर 11 660 रद्द बाबत अपील दाखल आहे .

आहे सदरअन्यायग्रस्त बाबीवर जगधने परीवार भूमिहीन झाला असून त्यांची घोर फसवणूक व अन्याय झाला असल्याची तक्रार दाखल असताना..

दिनांक रविवार 27/2/2022 रोजी अंकुश उत्तम गजभीव यांनी ट्रॅक्टर ,टेम्पो समवेत बेकायदेशीर किमान पंचवीस जणांची गैरमंडळी जमा करून हिराबाई जगधने समवेत त्यांच्या कुटुंबीयांना गलिच्छ घाण घाण शब्दात शिवीगाळ करून हाणमार केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या याबाबतची तक्रार शेवगाव पोलीस स्टेशनला गु .र. 234 प्रणाणे एन .सी .आर .दाखल असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.पण पोलिसांनी कडक कारवाई केलेली नाही या निषेधार्थ जगधने परिवाराने दिनांक 1/3/2022 रविवार रोजी शेवगाव तहसील समोर बोंबाबोंब आक्रोश आंदोलन सुरू केलेले आहे.

सदर उपोषणाला आधुनिक लहुजी सेना अहमदनगर काँग्रेस कमिटी शेवगाव आदि संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून या दोषीवर रॅकेटवर कारवाईची मागणी केलेली आहे .

आम्हाला न्याय मिळेपर्यंत उठणार नाही आणि मागण्या पासून हटणार नाही असे फिर्यादी हिराबाई जगधने यांनी कळविले असून या निषेधार्थ सचिन जगधने, रावसाहेब जगधने, रेखा ससाने ,कोंडीराम जगधने, उपोषणास बसले असून उपोषणस्थळी काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तुजारे यांनी भेट देऊन समर्थन केले आणि आंदोलन कडक करण्याचा इशारा दिला.

या प्रकरणात तहसीलदार छगन वाघ मंडलाधिकारी विठ्ठल भडके तलाठी कुणाल गोंधळी यांना हाताशी धरून अंकुश उत्तम गजभीव, दिलीप राधाकिसन अवताडे यांनी आम्हाला भूमिहीन करून अन्यायग्रस्त केले आहे.

या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी म्हणून आम्ही बेमुदत आक्रोश आंदोलन सुरू केले आहे यामध्ये राज्यातील सामाजिक संघटनांनी सामील व्हावे शासनाचे लक्ष वेधावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन जगधने कुटुंबयांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here