
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृतीसंबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67 (अ) अंतर्गत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. आपण तात्काळपणे पद सोडत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी लिहिलं आहे की, ‘आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.
‘त्यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले आहेत. तसंच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, ऑगस्ट 2028 पर्यंत धनखड यांचा कार्यकाळ होता. मात्र त्याआधीच धनखड राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढील उपराष्ट्रपती कोण होते हे पाहावे लागणार आहे.