छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत चांदमल राठोड यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी- प्रकाश लुनिया.

छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत चांदमल राठोड यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी- प्रकाश लुनिया.

खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत चांदमल राठोड ही व्यक्ती व त्याचे कुटुंबीय हे सर्व अहमदनगर छावणी परिषद हद्दीतील रहिवासी नसून ते राधानगरी नागरदेवळे येथील रहिवासी असून त्यांनी छावणी परिषदेच्या कार्यालयात खोटी कागदपत्रे देऊन भिंगार सदर बाजार येथील रहिवासी आहे असे भासवून छावणी परिषदेचे उपाध्यक्ष पदी नामनिर्देशित सदस्य पद भूषवित आहे वसंत राठोड हे अहमदनगर छावणी परिषद हद्दीतील रहिवासी नसून त्यांचा आणखी एक पुरावा सादर केलेला आहे.

स्वयघोषणा पत्राची झेरॉक्स जोडलेली आहे त्यामुळे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत चांदमल राठोड यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे त्याचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करून त्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात यावे या मागणीसाठी प्रकाश कांतीलाल लूनिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर छावणी परिषद यांना पुराव्यासहित निवेदन देऊन मागणी केली आहे.

प्रकाश कांतीलाल दूनिया यांनी या पत्राची प्रत डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट तसेच प्रिन्सिपल डायरेक्टर पुणे व जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here