छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आ. जगतापांवर गुन्हा दाखल करा भाजपची मागणी

480
  • अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या लोकार्पणाचा बहाणा करून आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी (दि. ६) संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घातलेला धिंगाणा, गोंधळ निषेधार्थ आहे.
  • हिडीस पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. त्यामुळे आ. जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते वसंत लोढा (Vasant Lodha) यांनी केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नगरमध्ये (Ahmednagar) रविवारी (Sunday) लोकार्पणानंतर निर्माण झालेल्या वादात भाजपनेही आता उडी घेतली आहे. वसंत लोढा यांनी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेवून भूमिका व्यक्त केली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड (Bhanudas Berad), ज्येष्ठ नेते अभय आगरकर (Abhay Agarkar), यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here