चोरी च्या गुन्ह्यातील आरोपीकडुन 2,25,000/-रु. किंमतीचे ट्रक चे इंजिनचे गिअर बॉक्स व इतर स्पेअर पार्ट असा मुद्देमाल हस्तगत…
.श्रीगोंदा:
याबाबत सविस्तर माहिती: फिर्यादी विकास नानाभाऊ जगताप रा. ढोकराई ता. श्रीगोंदा यांचे अथर्व इंजिनेअरिंग नावाच्या दुकानातून 39,000/- रुपये किंमतीचे हायड्रोलिक मशिनचे स्केअर बार शेती अवजारे बनविण्याचे लोखंडी साहीत्य, लोखंडी खिडकी, लोखंडी पट्टया असे दि. 21/12/2021 रोजी रात्री चोरी गे ल्या बाबत दिलेल्या फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि. नं. 869/2021 भा.द.वि.क.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा
1 ) उमेश गरड्या पवार वय रा. निमगाव खलु ता. श्रीगोंदा 2) दत्तु दिलीप पवार वय वर्षे, रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा यांनी केली आहे.
तसेच आरोपींनी मढेवडगाव येथील गॅरेज मधुन वाहनांचे सुट्टे भाग, ट्रकचे इंजिनचे सामान, काष्टी येथुन टायरचे लोखंडी डिस्क, इंजिन चे सामाने इत्यादी सुट्टे भागाची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरचे गुन्हे करताना आरोपींनी मारुती 800 कार तिचा आर.टी.ओ.नं.एम.एच.24 सी. 4786 ही वापरली असल्याची कबुली दिली त्यावरुन आरोपीचे घराची व मारुती 800 गाडी ची झडती घेतली असता त्याचे कब्जात चारचाकी वाहनांचे गाड्यांचे स्पेअर पार्ट, लोखंडी मटेरियल, गुन्ह्यात वापरलेली मारुती 800 कार असा एकुण 2,25,000/- रुपयेकिंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांचेकडुन खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अशाप्रकारे दाखल असलेले तिन गुन्हे उघड करण्यात आले असुन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व एक मारुती सुझुकी कंपनीची 800 गाडी असा एकुण 2,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रोहीदास झुंजार हे करीत आहेत.