चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून झोपलेल्या फिर्यादीचे आईचे साठ हजार रुपये

    159

    PressNote
    Dt 18/08/2023

    बेलवंडी पोस्ट हद्दीत दिनांक 01/07/2023 रोजी फिर्यादी विजय विनायक हेगडे यांची आई हौसाबाई ही छपराची खोलीत दरवाजा उघडा ठेवून झोपली असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून झोपलेल्या फिर्यादीचे आईचे साठ हजार रुपये किमतीचे कानातील फुल ,वेल व गळ्यातील मिनी मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने चोरून नेले व जाताना छपराचे खोलीला बाहेरून दरवाजाची कडी लावून पळून गेले वगैरे मजकूरची विजय विनायक घेगडे व 31 वर्ष राहणार माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांचे फिर्यादीवरून बेलवंडी पोस्ट गु नंबर 267 / 2023 भादवी कलम 380 342 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कोळपे व पोलीस नाईक शरद गांगर्डे हे करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा 1)अजय उलाशा काळे राहणार ढोबळे वस्ती कडूस तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर 2 ) गणेश सुरेश भोसले राहणार वाळुंज तालुका आष्टी जिल्हा बीड 3) धीरज उर्फ धीरेश सादीस काळे राहणार शंभू डोंगर निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी त्यांचा साथीदार किरण भाऊसाहेब बेंद्रे व 28 वर्षे राहणार वाळुंज तालुका जिल्हा अहमदनगरसह केला आहे .सदर इसमांबाबत तपास करता सदर ईसम हे शिक्रापूर पोस्टे गुर नंबर 577/2023 भादवि कलम 395 प्रमाणे या गुन्ह्यात अटक असले बाबत माहिती मिळाल्याने त्यांना दिनांक 8/ 8 /2023 रोजी बेलवंडी पोस्ट गुर नंबर 267/2023 मध्ये वर्ग करून घेऊन आरोपींना सदर गुन्ह्यात दिनांक 08/08/2023 रोजी अटक करून त्यांना मा. न्यायालया पुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 18/08/2023 रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड दिल्याने पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माला पैकी ३० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे फुले व पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल असा एकूण 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे,सहाय्यक फौजदार कोळपे ,पोलीस नाईक शरद गांगर्डे पोलीस शिपाई विनोद पवार, संदीप दिवटे ,कैलास शीपणकर, सतीश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गुंड,चालक विकास सोनवणे ,भाऊसाहेब शिंदे यांनी केली. पुढील तपास एएसआय श्री कोळपे करत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here