चैन स्नॅचिंग’ आणि ‘बॅग लिफ्टिंग’साठी स्वतंत्र पथके! गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्यासाठी अहमदनगरचे एसपी मनोज पाटील यांचा ‘मोठ्ठा’ निर्णय!

‘चैन स्नॅचिंग’ आणि ‘बॅग लिफ्टिंग’साठी स्वतंत्र पथके! गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्यासाठी अहमदनगरचे एसपी मनोज पाटील यांचा ‘मोठ्ठा’ निर्णय!

मध्यंतरी नगर शहर आणि परिसरात पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातले दागिणे धूमस्टाईलने ओरबाडून नेणे आणि नागरिकांच्या हातातली पैशांची पिशवी हिसका देऊन नेण्याचे प्रकार खूप वाढले होते. या प्रकाराचे लोण ग्रामीण भागातही गेले होते.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन एसपी मनोज पाटील यांनी ‘चैन स्नॅचिंग’ आणि ‘बॅग लिफ्टिंग’च्या गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी आणि असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे या पथकांचे नेतृत्व करणार आहेत.

विशेष म्हणजे या पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि गुन्हेगारांच्या ‘मोडस आॅपरेंटी’चा खास अभ्यास असलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ 98226 15370 आणि सहाय्यक फौजदार संजय खंडागळे 8767828679 तसेच बापूसाहेब फोलाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.ही पथके गुन्हे उघडकीस आणणेकामी संबंधित पोलीस ठाणे, संबंधित पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच मोबाईल सेल, स्थानिक गुन्हे शाखा यांची तांत्रिक मदत घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघड आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करतील.यामुळे गुन्हा घडल्यानंतर तात्काळ गुन्ह्यांच्या ठिकाणी भेट देणे, गुन्ह्यांची उकल करणे, गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न करणे, अशा आरोपींचा शोध घेणे, त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत करणे, त्यांनी याच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का आदींचा तपास करणे आणि वेळच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना अहवाल सादर करण्याचे काम ही पथके करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here