चीनच्या संशोधकांची वायफळ बडबड, म्हणाले – ‘कोरोना व्हायरसचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला’
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये सापडला. त्याला आता एक वर्ष उलटून गेले. या व्हायरसमुळे लाखो लोकांचा बळी घेतला.
चीनच्या एका वैज्ञानिकाने भारतातूनच कोरोना महामारी जगभरात पसरल्याचा आरोप केला आहे. चीनची अकादमी ऑफ साय़न्सेजच्या वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. ते म्हणतात की, भारतात 2019 च्या उन्हाळ्यात हा व्हायरस जन्माला आला होता.
हा व्हायरस जनावराद्वारे दूषित पाण्यातून माणसामध्ये आला. त्यानंतर हा व्हायरस तेथून वुहानला आला. जिथे पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा रुग्ण सापडला. चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये याबाबतचा अहवाल छापून आला आहे.
अमेरिका, इटलीवरही केला होता आरोप:-
ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाचे एक संशोधक डेव्हिड रॉबर्टसन यांनी डेली मेलला सांगितले की, चीनचे संशोधन खूपच सदोष आहे.
डब्ल्यूएचओला मिळालेल्या पुराव्यांनुसार कोरोना व्हायरस चीनमध्येच तयार झाला आहे. डब्ल्यूएचओने तपासणी पथकही चीनला पाठविले आहे.






