जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनने आता भारतासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. चीनने घेतलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे. ? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
कडबोळी:
कडबोळी
साहित्य:• २ भांडी कडबोळ्याची भाजणी• दीड चमचा मीठ• अर्धा चमचा हळद• अर्धा चमचा हिंग• २ चमचे लाल तिखट•...
‘भारत जोडो न्याय यात्रेची कल्पना आहे…’, काँग्रेस खासदार राहुल गांधी नागालँडमध्ये म्हणतात
मंगळवारी सकाळी नागालँडमधील कोहिमा येथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले...
मुंबईत कोरोनाचा कहर कायम, नवे 16 हजार 420 कोरोनाबाधित
Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नसून मागील दोन दिवस काहीशी आटोक्यात येणारी रुग्णसंख्या आज पुन्हा...
सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाह
सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाहसिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात...