चिमुकल्याना ‘ऑनलाईन गेम’चं व्यसन घातक! मुक्ता चैतन्य यांचं मत!
मुंबई : गेल्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी घरातल्या चिमुकल्यांना मोबाईलवरच्या ऑनलाईन गेमचं व्यसन लागू शकतं, असं जर कोणी म्हटलं असतं तर त्याला सर्वांनी मुर्खात काढलं असतं. कारण त्यावेळी मोबाईल अत्यंत कमी लोकांकडे विशेषतः श्रीमंतांकडेच पाहायला मिळायचे. त्यामुळे मोबाईलच्या ऑनलाईन गेमचं चिमुकल्यांना व्यसन लागणं, हे हास्यास्पद वाटायचं. मात्र काळ बदललाय. हा धोका आपल्या चिमुकल्यांना होऊ शकतो, किंबहुना होतोच, असं स्पष्ट आणि वास्तववादी मत सोशल मिडियाच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केलंय.
त्यामुळे साहजिकच पालकांची जबाबदारी वाढली आहे. यासंदर्भात मुक्ता चैतन्य सांगताहेत, ‘लहानपणापासून हातात असणारा मोबाइल, स्वस्तात मिळणारे नेट पॅक यामुळे मुलं ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होतात.
ऑनलाइन गेमिंग डिझाईन करतानाच मुलं वारंवार तिथे परत येतील, यासाठी काही ‘ट्रिगर्स’ तयार केलेले असतात. यामुळे मुलं वारंवार ऑनलाइन गेमिंगकडे वळतात तसंच त्यांना व्यसन लागण्याचंही भीती असते.
मुलांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकू नये, यासाठी पालक म्हणून नेमकं काय केलं पाहिजे, तर पालकांनीच स्वतःवर काही बंधनं घालून घेण्याची आवश्यकता आहे. यातले धोके म्हणजे मुलं शकतात. त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे याविषयी मुलांमध्ये जागरूकता आणूं देण्याचं काम पालकांनी करायला हवंय’.