चार वर्षापासून पसार असलेला दरोडेखोर अखेर गजाआड:

चार वर्षापासून पसार असलेला दरोडेखोर अखेर गजाआड अहमदनगर: मागील चार वर्षापासून पसार असलेला सराईत गुन्हेगार गजाआड करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. सन २०१७ मध्ये तालुक्यातील उक्कलगाव येथील आरोपी सागर गोरख मांजरे याने आपल्या सात साथीदारासह दरोड्याची तयारी करुन अहमदनगर शहरामध्ये हत्यारे व वाहनासह पोलीसांना आढळुन आला. पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपी सागर गोरख मांजरे याच्यासह साथीदार गोविंद बाळू गुंजाळ (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गोविंद बाळू गुंजाळ हा घटनास्थळावरुन पसार झाला होता. तेव्हापासून तो वेळोवेळी राहण्याचे ठिकाणे बदलून विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता.अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल कटके यांच्या यांच्या पथकाने तालुक्यातील उक्कलगाव येथे सापळा लावून आरोपी गोविंद बाळू गुंजाळ याला शिताफितीने ताब्यात घेतले. चौकशी करुन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपीला हजर केले. गोविंद बाळू गुंजाळ याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यासह राहाता व राहुरी पोलीस ठाण्यात विविध स्वरुपातील गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here