कच्चा माल, आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आपल्या देशातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे
कसे असतील नवे दर ?
Tata Motors – मारुती सुझुकीने 2021 मध्ये आपल्या वाहनांच्या किमतीत 4.9% ने वाढ केली आहे – कंपनीने सर्वप्रथम जानेवारीमध्ये1.4 टक्के, नंतर एप्रिलमध्ये 1.6 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 1.9 टक्क्यांनी वाढ केली होती.
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमती आणि इतर इनपुट कॉस्ट वाढतच आहेत. वाढत्या किंमतीच्या परिणामावर मात करण्यासाठी कंपनीला जानेवारी 2022 पासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणे भाग पडले आहे.
Maruti Suzuki – देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. मारुतीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, “गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे, कंपनीसाठी हे अत्यावश्यक बनले आहे की ग्राहकांवर अतिरिक्त खर्चाचा काही भार देऊन तोटा भरुन काढला जाईल.
Toyota Motars – टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2022 पासून ते त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवतील. वाढत्या इनपुट कॉस्टला कंपनीने याचे श्रेय दिले आहे. ही दरवाढ टोयोटाने ऑफर केलेल्या सर्व मॉडेल्सवर लागू होईल.
Volkswagen – फोक्सवॅगन कंपनीने देखील आपल्या मॉडेल आणि व्हेरिएंटवर नुसार 2 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
फोक्सवॅगनने गुरुवारी जाहीर केले होते की, ते नवीन वर्षात 1 जानेवारीपासून पोलो, व्हेंटो आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही टायगुनच्या किमती वाढवणार आहेत. फॉक्सवॅगन आता अशा कार निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांनी जानेवारीपासून दरवाढीची पुष्टी केली आहे. देशातील इतर अनेक ब्रँड्सप्रमाणे, फोक्सवॅगनने वाढत्या इनपुट्स आणि ऑपरेशनल कॉस्टमुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Honda– कंपनी इतर सर्व वाहन निर्मात्यांसोबत जानेवारी 2022 पासून त्यांच्या वाहनांची किंमत वाढविण्याचा विचार करत आहे. कंपनीने या वर्षी ऑगस्टमध्ये शेवटची किंमत वाढवली होती. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कमोडिटीच्या किमती वाढल्यामुळे इनपुट कॉस्टवर लक्षणीय परिणाम झाला आहे. Honda ने काही महिन्यांपूर्वी पाचव्या जनरेशनमधील होंडा सिटी लाँच केली होती.