चापडगाव शिवारात भीषण अपघात ; चालक गंभीर
जखमीआज शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगर – सोलापूर महामार्गावर चापडगाव शिवारात दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.N 92, D 7338 हा आयशर ट्रक सोलापूरकडुन नगरकडे जात होता. तर दुसरा ट्रक RJ O9 GB 8711 नगरकडुन सोलापूरकडे चालला होता. सोलापूरकडे जाणा-या ट्रक चालकाचा ताबा सुटला व तो समोरुन येणा-या आयशर ट्रकवर जोरदार धक्का देऊन त्यालाही सोलापूरच्या दिशेने 100 फुट फरपटत ओढीत नेले. यात आयशरमधील ड्रायव्हरला (नाव समजू शकले नाही) जबर मार लागला आहे.चालकाला चापडगावच्या युवकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून नगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. यात इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.