चांदबीबी महाल परिसरातील आरोपीस जेरबंद ;नगर तालुका पोलीसांची कारवाई.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका आरोपीस जेरबंद केले आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे सदर आरोपीचे नाव आहे.तो एक सराईत गुन्हेगार असून चाँदबीबी महालाखाली त्याने पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा गुन्हा केला होता.
प्रवीण गोविंदराव निटूरकर (वय 52 रा. लक्ष्मीटॉवर, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, सावेडी) हे कुटुंबीयासह चांदबिबी महालाच्या डोंगरावरती असणाऱ्या एका कच्च्या रस्त्यावर फिरायला गेले होते.
त्यावेळी चाकूचा व दगडाचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, मंगळसूत्र असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा चोरटयांनी लंपास केलेला होता.
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलीस नाईक भानुदास सोनवणे,ज्ञानेश्वर खिळे, संभाजी बोराडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्यावर अहमदनगर व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान चाँदबीबी महाल हा परिसर अनेक पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. अनेक निसर्ग प्रेमी देखील तेथे येत असतात.
अनेक वृद्ध अन प्रौढ व्यक्ती त्याठिकाणी व्यायामासाठी जात असतात.
त्यामुळे असे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी त्वरित ऍक्शन घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे