चांदणी चौकातील फुटपाथ वर झोपलेल्या तिघांना आयशर टेम्पोने चिरडले, एकाचा मृत्यू!

चांदणी चौकातील फुटपाथ वर झोपलेल्या तिघांना आयशर टेम्पोने चिरडले, एकाचा मृत्यू!

अहमदनगर शहरातील नगर सोलापूर महामार्गावर शहरानजीक असलेल्या चांदणीचौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडले.

या अपघातात एक निद्रिस्त बूट विक्रेता जागेवरच ठार झाला . इतर दोघे बूट विक्रेते तसेच टेम्पोतील दोनजन असे एकूण चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रात्री दोनच्या सुमारास झाला. मेहताब शेख (वय -21 रा – उत्तरप्रदेश) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुसाईद शेख (वय 25), जावेद शेख (वय -20) हे दोघे जखमी झाले आहेत.

सोलापूरहून नगर च्या दिशेने येत असलेला एक मालवाहू आयशर टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिस जवळ सुटले,
याठिकाणी फुटपाथवर परप्रांतीय बूट विक्रेते रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना त्यांना या टेम्पोने चिरडले . यात मेहताब शेख याचा मृत्यू झाला, तर झोपलेले इतर दोघे , तसेच टेम्पोतून प्रवास करणारे दोघे असे या अपघातात जखमी झाले.

याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here