
अहमदनगर दि :- ८/४/२०२३, कोतवाली पोलीस स्टेशन, संजयनगर पुनर्वसन प्रकल्प व बालभवन यांच्या संयुक्त विद्यमानाने संजयनगर सेवावस्तीमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.चंद्रशेखर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संजयनगर बालभवन येथे कार्यक्रम पार पडला.
या परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल. यासाठी “कायदेविषयक जनजागृती” हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माळीवाडा-आयुर्वेद चौकातील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या शहरातील प्रसिद्ध संजयनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू झाले आहे. येथे राहणाऱ्या सर्वधर्मिय २९८ परिवारांना प्रत्येकी १ लाखात त्यांचे हक्काचे घर मिळून देण्यासाठी काम सुरू आहे.२९८ घरापैकी ३३ घराची सोसायटी तयार करून तेथील रहिवाशांना सुपूर्त केली आहे.
यामध्ये पोलीस निरीक्षक यांनी बोलताना सांगितले की पोलीस पहिल्यांदाच इथे एखाद्या कार्यक्रमासाठी आले असतील. गुन्हेगार चेक करण्यासाठीच जास्त वेळा पोलीस येथे येतात परंतु आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी चालू आहे असे सांगून चांगल्या गोष्टी करा जो चुकतोय त्याला तुझं चुकतय म्हणून सांगा. बाहेरच्या चुकीच्या लोकांना येथे थारा देऊ नका. चांगल्या गोष्टीसाठी पोलीस स्टेशनचे दरवाजे खुले असून चुकीच्या गोष्टींमध्ये कडक शासन करण्यात येईल असे सांगून मुलांना शिकवा चांगली नोकरी व्यवसाय करायला लावा असे आवाहन केले.
छोट्या छोट्या चुकीमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतात. यामुळे आपले आयुष्य उध्वस्त होऊ शकते. प्रत्येक समाजात चांगले लोक असतात. पण काही लोकांमुळे पूर्ण समाजावर कलंक लागतो. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना वाईट संगती पासून लांब ठेवले पाहिजे. चुकीच्या गोष्टी करू नये असे मार्गदर्शन सतत पालकांनी केले पाहिजे. अनेक युवकांकडून नकळत होणाऱ्या गुन्हेगारीत अडकत असतात. यामुळे त्यांच आयुष्य उध्वस्त होऊन जाते. जो चांगला वागतो त्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होईल परंतु जो चुकीच्या पद्धतीने वागेल त्याला कडक शासन करण्यात येईल असे सांगितले.

यानंतर बाल भवन चे मानद संचालक श्री. संजय बंदस्ती यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की संजय नगर परिसरामध्ये असणाऱ्या अवस्थेविषयी प्रश्न मांडायला आता तयार व्हायला पाहिजे. भावनेचे भरात अनेक गुन्हे घडून जातात. नंतर शेवटी पश्चाताप आपल्या हाती राहतो. त्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या स्वतःमध्ये जनजागृती कडून आणली पाहिजे. त्यांनी पुढे गुन्हे न करता कुठेतरी काम केले पाहिजे मी स्वतः एक उद्योजक असल्याने रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध करून देऊ शकतो. पण आपण त्यासाठी तयार होणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक माननीय हनीफ शेख सर यांनी केली. प्रस्तावनामध्ये सांगताना स्नेहालयाचे 20 वर्षाचे कामाबद्दल मान्यवरांना माहिती दिली. याचबरोबर बालविवाह बालकांचे अधिकार बालकांसंदर्भातले कायदे, महिलांविषयीचे कायदे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आणि आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी घडणार नाही याची सर्वांनी दक्षता इथून पुढे घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक श्री. महेश सूर्यवंशी, कोतवाली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कचरे साहेब, सौ. वैशाली चोपडा, श्री. किरण थोरात, कु. सार्थक चोपडा, राहुल कांबळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे वरिष्ठ सामुदायिक प्रतिनिधी ऋतिक लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सामुदायिक प्रतिनिधी सीमा जुनी यांनी केले. या कार्यक्रमात संपन्न होण्यासाठी संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रवीण कदम आणि बाल भवन प्रकल्पाचे सौ.उषा खोल्लम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.अंजली व्यास, कु.साहिल पठाण, सौ. शारदा न्यानपल्ली, श्री. अंबादास पोटे, श्री. विक्रम भगत, नीलोफर शेख, त्यांनी परिश्रम घेतला.




