चक्रव्यूहात अडकलेल्या फडणवीस सरकारसमोर मराठा आरक्षणावर तोडगा काय? ५ पर्याय

    78

    Fadanvis GOVT Answer on MarathaReservation: मराठ्यांना दुखावले तर समाजाचा रोष,ओबीसींना चुचकारले तर व्होट बँक हातातून जाण्याच्या भीतीने राज्य सरकार कात्रीत सापडले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी सरकारसमोर काय पर्याय आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

    मराठवाड्यातील मराठा समाज हाच कुणबी आहे. सातारा आणि हैद्राबाद गॅजेटमध्ये त्याचा उल्लेख आहे. याच कागदपत्रांच्या आधारे राज्य शासनाने मराठा हेच कुणबी असा शासकीय अध्यादेश काढावा, अशी प्रखर मागणी मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केल्याने राज्य सरकार पेचात सापडले आहे.त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण द्यावे, या मागणीवर विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्य सरकारमधील मंत्र्यांनी केली आहे. त्यावर केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे त्यांनीच हा प्रश्न सोडवावा किंबहुना सोडवू शकतात, असे म्हणत यक्ष प्रश्न आरक्षणाचा चेंडू विरोधकांनी पुन्हा सत्तेच्या कोर्टातच ढकलला आहे. विरोधकांच्या चालाख खेळीमुळे सरकार अजूनच कोंडीत सापडले आहे. मराठ्यांना दुखावले तर समाजाचा रोष, ओबीसींना चुचकारले तर व्होट बँक हातातून जाण्याच्या भीतीने राज्य सरकार कात्रीत सापडले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी सरकारसमोर काय पर्याय आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here