चंदन चोरीवर कर्जत पोलिसांची मोठी कारवाई

    151

    पोलीस निरीक्षक बळप यांनी कर्जत पोलीस स्टेशन हाददीत गस्त घालणारे पोलीस पथकास माहीती देवून सदर ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने त्या ठिकाणी पोलीस पथक जावून खात्री केली असता दोन इसम स्कॉरपीओ गाडीजवळ उभे दिसले त्यावेळी पोलीस पथक त्यांचे दिशेने जात असल्याची सदर इसमांना चाहुल लागल्याने सदर इसम गाडी सोडुन पळुन जात असतांना त्यातील स्कॉर्पीओ गाडीचालक यास पकडुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश हनुमंत गुंड, वय 28 वर्ष रा. नारायण चिंचोली ता. पंढरपुर जि. सोलापुर असे सांगुन पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता दादा निकत रा. आंबीजळगाव ता. कर्जत असे सांगुन सदर स्कॉपीओ गाडीची पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात 3,83,000/- रुपये किंमतीचे 95 किलो चंदनाची तासलेली गाभ्याची लहान मोठी गोण्यात भरलेली लाकडे व तासुन निघालेली छिलके असे मिळुन आल तसेच 4,50,000/- रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी आसा एकुण 8,33000 / – मददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर ताब्यातील आरोपी मजकुर याने दादा निकत याचेकडुन सदरचा मुददेमाल विकत घेतले बाबत सांगीतले आहे. सदर आरोपी यास कर्जत पोलीस स्टेशन दाखल असलेल्या चंदन चोरीच्या गुन्हयात अटक करुन त्यास मा न्यायालयत हजर केले असता एक दिवस पोलीस कस्टडी दिली आहे. सदर आरोपी कडुन कर्जत तालुक्यातील चंदन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास सफौ शेख करत आहेत.

    सदरची कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पोलीस उप निरीक्षक प्रदिप बो- हाडे, सहा. फौ. सलीम शेख, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सचिन थोरात, लक्ष्मण ढवळे, शकील बेग यांनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here