घाटकोपरचे मनसे नेते महेश भानुशाली यांना अटक; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर घडामोडींना वेग
मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
मुंबईत पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. तसंच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे. महेश भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत.
मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईत पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. तसंच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे.
महेश भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून सामान जप्त केलं आहे.
दरम्यान राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आङे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात
“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा कट
इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.